शिराळा (जी.जी.पाटील)
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील गुढे पांचगणी पठारावरील श्री. कमला माधव विद्यामंदिर गुढे (बेंद) शाळेतील सन २००४ – २००५ या वर्षातील इयत्ता दहावीच्या बॅच नी उत्सव मैत्रीचा, सन्मान गुरुजनांचा हे ब्रीद वाक्य घेऊन तब्बल १८ वर्षानंतर शाळेत येवून गुरूजनांचा आदर केला.या सोहळ्यामध्ये माजी विद्यार्थ्यानी शिक्षकांना आकर्षित सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.सोहळ्या चे खास आकर्षण म्हणजे शिक्षकांच्या आगमन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांवरती पुष्पवर्षाव करून स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी हाताला सुगंधी अत्तर लावून, पेढा भरवून शिक्षकांचे स्वागत करून शिक्षकांना दिमाखात व्यासपीठावर बसवले.हा साराच प्रकार पाहुन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भारावून गेले.काहींचे डोळे पाणावले आनंदाश्रु वाहु लागले.आपल्या कामाची कृतज्ञता अशी मुलानी व्यक्त केल्याने सगळेच भावूक झाले.या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यपाक श्री एस आर पाटील होते.सुत्रसंचालन संदीप खोत यानी केले.
माजी विद्यार्थी संदीप खोत म्हणाले,संस्थेचे संस्थापक कै. बापूसाहेब देशपांडे यांनी ह्या डोंगरपठारावर छोटेसे उभे केलेले संकुल चालवण्याचे काम सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणे चालू ठेवले आहे .प्रत्येकाने कर्म करत जावे फळाची अपेक्षा करू नये, ते आपोआप मिळते त्याची जाणीव शिक्षकांना या दिवशी झाली.
यावेळी एस. एस. पाटील, एस.एम.पाटील ,एल.आर.खोत व्ही.आर.कदम ए. डी.भाष्टे आर. के. कांबळे ,पी .व्ही. चौगुले, आर. टी. राऊत, सौ.अरुणा शिंदे,आकांक्षा अशोक भाष्टे, एस .डी .देशपांडे, डी. एस. पाटील, शिक्षकेतर कर्मचारी अरुणकुमार पाटील, विलास कांबळे,रविंद्र पाटील भीमराव सुतार उपस्थित होते. यावेळी आभार दीपक गुंडगे यांनी मानले.
सोहळ्यात सन २००४-२००५ माजी विद्यार्थ्यानी शाळेतील अनाथ,गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांचे पालकत्व स्विकारले.त्यांचा शिक्षण व इतर सर्व खर्च करणार असल्याचे जाहिर केले.