चंदगड- शुभांगी पाटील
चंदगड – हलकर्णी महाविद्यालयाचे तावरेवाडी येथील श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभाचे प्रमुख वक्ते विनायक देसाई चंदगड ग्रामीण रुग्णालय यांनी केले एनएसएसमुळे मला सामाजिक दर्जा, नोकरी ,लग्न, घरदार हे सर्व काही मिळाले आहे. एनएसएसच्या स्वयंसेवक रात्रंदिवस कोणतेही काम करण्यास तयार असतात माझ्या रक्तात एनएसएस आहे. एवढे प्रेम एनएसएसवर केलेले आज आयएस, आयपीएस चे सर्व अधिकारी तिथपर्यंत पोहोचले आहेत.
एनएसएस मध्ये गावच्या स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता ही होते असे संबोधित केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मान. श्री अशोक जाधव यांनी विद्यार्थी दशेमध्येच सामाजिक क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी विविध उच्च पदस्थ व्यक्तींचे मार्गदर्शन, ग्रामस्वच्छता ,गटचर्चा करण्याचे एनएसएस हे व्यासपीठ आहे निश्चितपणे भविष्यामध्ये या अनुभवाचा आपल्याला उपयोग होईल असे मत अध्यक्षांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी डी अजळकरयांनी एनएसएस शिबिरार्थीसाठी मौलाचे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले.
डेंजर्सः..बापरे, उलटीतून तब्बल साडेतीन काेटी! पाेलीस पण सव्वाशेर निघाले, काय प्रकार ताे पहा सविस्तर
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यु एस पाटील यांनी केले उपस्थित पाहुण्यांचे स्वागत एनएसएस विभाग प्रमुख प्रा. जी जे गावडे यांनी केले यावेळी ग्रामपंचायत तावरेवाडी यांच्याकडून महाविद्यालयाला भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष माननीय श्री संजय पाटील सरपंच माधुरी कागन कर ,ग्रामसेवक महा सिद्धनाथ हाके ,केशव आवडन ,सतीश कागनकर, साताप्पा पाटील, अनिल पाटील उपस्थित होते याबरोबर महाविद्यालयाचे प्रा. अंकुश नौकुडकर डॉ. जे जे व्हटकर, सौ गीतांजली पाटील, सुवर्णा पाटील, राजू बागडी, दिलीप पाटील ,एनएसएस प्रतिनिधी महेश साबंद्रेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. शाहू गावडे यांनी मांडले तर सूत्रसंचालन कुमारी माधुरी सुतार यांनी केले.