विजय बकरे
राधानगरी येथे बंद असलेला जनावरांचा बाजार अखेर नूतन सरपंच सविता राजाराम भाटळे यांच्या पुढाकरामुळे रविवार पासुन प्रत्येक आठवडी बाजार सुरू झाला आहे. या जनावरांच्या बाजारास स्थानिक शेतकरी व परिसरातील व्यापारी वर्गणे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राधानगरी मध्ये जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत होता लॉकडाऊन व लंपी मुळे जनावरे खरेदी विक्री होत नव्हती तर कमी किंमतीत जनावरे पाळणाऱ्या शेतकरी कुटुंबार विकण्याची वेळ येत होती .यामुळे आघाडी प्रमुख राजाराम भाटळे यांनी बाजार सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. ती पूर्णत्वास आली आहे. बाजारात सुमारे 70 ते 80 जनावरे आली होती तर सुमारे 30 ते 40 जनावरांची खरेदी विक्री झाली आहे. तर आठवडी बाजारासाठी शेतकरी व व्यापारी यांनी आपली खरेदी विक्रीची जनावरे बाजारात आणावी असे आव्हान उपसरपंच डी एस कांबळे यांनी केली.
यावेळी बाळासाहेब कळमकर, जगदीश गोजारे, तुषार पाटील,दशरथ टिपुगडे, संभाजी पाटील, सुनील थर सरवडेकर, सचिन भाटळे,रवी मरगळे, प्रकाश पवार, पिंटू चांदम, अल्ताफ मुजावर, पिंटू नाईक यांच्यासह परिसरातील जनावरे व्यापारी उपस्थित होते.
धक्कादायक.. इथं व्हायची गर्भलिंग चाचणी! आणि… मुख्य सूत्रधार निघाला