सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती मार्फत सहावा बालचित्रपट महोत्सव बुधवार दि. २२ आणि गुरुवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ‘ वारसा ‘ या माहितीपटाचे दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जगभरातील सहा उत्तमोत्तम चित्रपट दाखविण्यात येणार असून याचा लाभ प्रामुख्याने महानगरपालिकेच्या ५९ शाळांमधील ३००० विद्याथ्यांनी घेतला.
चिल्लर पार्टीतर्फे महिन्याच्या चौथ्या रविवारी मुलांसाठी जगातील उत्तमोत्तम चित्रपट दाखविले जातात. समाजातील जागरूक पालकांची मुले या उपक्रमाला उपस्थित असतात; परंतु ज्यांना रोजच्या रोजीरोटीची चिंता आहे, अशा वंचित कुटुंबातील मुलांपर्यंत बाल चित्रपट पोहोचविण्यासाठी चिल्लर पार्टीतर्फे गेली पाच वर्षे हा बाल चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो. यंदा या महोत्सवाचे सहावे वर्ष आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा- https://youtu.be/FOHXir87XtY
या महोत्सवाचे उद्घाटन शाहू स्मारक भवन येथे फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाचा समारोप २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी एस.के. यादव उपस्थित राहणार आहेत.
हे आहेत सिनेमे
या महोत्सवात रानाज् सायलेन्स, कल्टी, गुड डायनासोर, मियां अँड द व्हाईट लायन, पीटर रॅबिट आणि सिंदबाद : लिजेंड ऑफ द सेव्हन सीज हे सहा सिनेमे दाखविण्यात येणार आहेत.
बालचित्रपटांच्या जागतिक इतिहासाचे प्रदर्शन
या बालचित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील बालचित्रपट चळवळीची माहिती असलेले खास प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये जागतिक बालचित्रपटांच्या इतिहासाबरोबरच भारतीय बालचित्रपटांचा इतिहासही या प्रदर्शनाच्या माध्यमातून बालप्रेक्षकांच्या समोर मांडण्यात येणार आहे.या प्रदर्शनाचे उदघाटन मा. उदय कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.
कागदी विमान उडवणाऱ्या मुलीचा विशेष लोगो
मोठी स्वप्ने पहायला शिकविणारे आणि अथांग पाण्यात मुक्तपणाने विहार करायला शिकविणारे प्रतीक म्हणून कागदी होडी पाण्यात सोडणाऱ्या मुलीचा विशेष लोगो या सहाव्या बालचित्रपट महोत्सवासाठी तयार करण्यात आला आहे. कागदी होडी पाण्यात सोडणाऱ्या या मुलीची मानसिकता दर्शविणारा हा यंदाचा विशेष लोगो चिल्लर पार्टीतर्फे साकारण्यात आला आहे. यापूर्वी सायकल फिरविणारी, पतंग उडविणारी, टायर फिरविणारी, भिरभिरं उडविणारी तसेच कागदी विमान उडवणाऱ्या मुलीचा विशेष लोगो विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरले होते.
२५ फूट लांबीच्या जहाजाची
प्रतिकृतीवर चिकटवणार कागदी होड्या
चिल्लर पार्टीतर्फे तयार केलेला या महोत्सवाचा लोगो म्हणजे कागदाच्या होड्या महानगरपालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केल्या आहेत. कांही कलाकृती मुलांना प्रोत्साहन म्हणून २५ फूट लांबीच्या जहाजाच्या प्रतिकृतीवर चिकटवण्यात येणार आहेत. तसेच कांही शाळांमधून टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या होड्यांचे प्रदर्शन महोत्सवाच्या कालावधीत शाहू स्मारक भवनाच्या प्रांगणात दर्शनी भागात ठेवण्यात येणार आहे.