WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

“खासदार चषक”खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा….रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य तर पुण्याचा निखिल दीक्षित उपविजेता; कोल्हापूरचा सम्मेद तृतीय

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Loading poll ...
Coming Soon
येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल?
{{ row.Answer_Title }} {{row.tsp_result_percent}} % {{row.Answer_Votes}} {{row.Answer_Votes}} ( {{row.tsp_result_percent}} % ) {{ tsp_result_no }}

पुलाची शिरोली:- :- जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या खासदार चषक खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर आठवा मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले तृतीय मानांकित पुण्याचा निखिल दीक्षित व अग्रमानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे या तिघांचे समान आठ गुण झालेमुळे सरस टायब्रेक गुणामुळे रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य ठरला तर पुण्याच्या निखिल दीक्षितला उपविजेत्यापदावर व अग्रमानांकित कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. श्रीराजला रोख २१ हजार रुपये व आकर्षक चषक, निखिल ला रोख पंधरा रुपये व आकर्षक चषक तर सम्मेद ला रोख दहा हजार रुपये व आकर्षक चषक खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

सहकारी साखर कारखाने; पर्यायाने शेतकर्‍यांना लाभ होणार-खासदार धनंजय महाडिक

रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, हायवे लगत, पुलाची शिरोली,कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात झाल्या.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही प्रवेश शुल्क नसलेली ही भारतातली पहिलीच खुली जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आहे. याशिवाय परगावच्या खेळाडूंची राहण्याची मोफत सोय करण्यातआली व सर्व खेळाडू पालकांना स्पर्धा स्थळी मोफत चहा नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात आले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ आदरणीय खासदार धनंजय महाडिक बी चॅनेल चे चेअरमन व खासदार क्रीडा महोत्सवचे प्रणेते पृथ्वीराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थित झाला.यावेळी स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मुख्य स्पर्धा संचालक मनीष मारुलकर, स्पर्धा सचिव धीरज वैद्य, स्पर्धा समन्वयक उमेश पाटील सर व उत्कर्ष लोमटे सर व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जीवनात खेळाचे महत्व पटवून दिले व पालकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आवाहन केले.

या स्पर्धेच्या उत्तम संयोजनाबद्दल संयोजक व पंचांचे कौतुक करून आभार मानले व पुढच्या वेळी या स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले त्यांना इचलकरंजीचे करण परीट, रोहित पोळ व विजय सलगर सांगलीचे पौर्णिमा उपळवीकर विजय माने व दीपक वायचळ, कोल्हापूरचे मनीष मारुलकर,आरती मोदी, सूर्याजी भोसले,उत्कर्ष लोमटे व महेश व्यापारी व सोलापूरचे उदय वगैरे यांचे सहकार्य लाभले. सीमा पुजारी, आनंदराव कुलकर्णी, राजू सोन्याच्या, अमित मोदी, राठोड मॅडम, रवींद्र निकम, डॉ. हरीश पाटील, प्रभाकर कांबळे, शेवडे साहेब, खान मॅडम, विजय माने सर, उदय वगैरे सर,कविता पाटील, गिरीश बाचीकर, यांच्या हस्ते सर्व उत्तेजनार्थ बक्षीस वितरित करण्यात आली.

परीक्षा पे चर्चा .. काेल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांनी साधला असा संवाद! विद्यार्थ्यांमध्ये वाढली आत्मविश्‍वासाची भावना…

बक्षीस विजेते पुढील प्रमाणे

खुला गट 15 बक्षिसे
1) श्रीराज भोसले रेंदाळ 2) निखिल दीक्षित पुणे 3) सम्मेद शेटेे कोल्हापूर 4) ओंकार कडव सातारा 5) राहुल शर्मा पुणे 6) अभिषेक गणीगेर बेळगाव 7) निरंजन नवलगुंद बेंगलोर 8) मानस गायकवाड सोलापूर 9) सुयोग वाघ अहमदनगर 10) ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर 11) पुष्कर ढेरे मुंबई 12)सोहम खासबारदार कोल्हापूर 13) तुषार शर्मा कोल्हापूर 14) अभिषेक पाटील मिरज 15) प्रणव पाटील कोल्हापूर
उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू (साठ वर्षावरील)
1) राजू सोनेचा सांगली 2) रवींद्र कुलकर्णी कोल्हापूर 3) दिलीप कुलकर्णी सांगली 4) माधव देवस्थळी कोल्हापूर 5) भारत पाटोळे निपाणी
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू
1) ऋचा पुजारी कोल्हापूर 2) दिव्या पाटील जयसिंगपूर 3) श्रेया हिप्परगी जत 4) दिशा पाटील जयसिंगपूर 5) शर्वरी कबनूरकर कोल्हापूर
उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू
1) अभिजीत कांबळे तासगाव 2) मोहसीन सय्यद राजापूर 3) विनोद सावंत पुणे
उत्कृष्ट बिगर गुनांकित बुद्धिबळपटू
1) सिद्धेश नार पुणे 2) स्वरूप साळवे गडहिंग्लज 3) दीपक क्षीरसागर लोणंद 4) पुनम चांडक धारवाड 5) सिद्धांत तेलकर लोणंद
उत्कृष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील बुद्धिबळपटू
1) श्रीधर तावडे कोल्हापूर 2) अथर्व चव्हाण कोल्हापूर 3) इम्रान बारस्कर शिरोली 4) आदित्य आळतेकर कोल्हापूर 5) शंकर साळुंके कोल्हापूर
उत्कृष्ट तेराशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू
1) विवान सोनी इचलकरंजी 2) बालकृष्ण पेडणेकर सावंतवाडी 3) प्रदीप दहाडे पुणे 4) सृष्टी हिप्परगी जत 5) हर्ष शेट्टी सांगली
उत्कृष्ट सोळाशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू
1) दीपंकर कांबळे फलटण 2) शर्विल पाटील कोल्हापूर 3) अनिश नाईक गोवा 4) प्रवीण कामत कर्नाटक 5) प्रदीप आवडे सातारा
उत्कृष्ट एकोणवीसशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू
1) प्रशांत नाईक मेंगलोर 2) आदित्य सावळकर कोल्हापूर 3) रवींद्र निकम इचलकरंजी 4) मुद्दसर पटेल मिरज 5) संतोष कांबळे कोल्हापूर
उत्कृष्ट पंधरा वर्षाखालील बुद्धिबळपटू
1) सुयोग वडके पुणे 2) अपूर्व देशमुख सातारा 3) प्रसन्ना जगदाळे बेळगाव 4) साई मंगनाईक बेळगाव 5) ईश्वरी जगदाळे सांगली
उत्कृष्ट तेरा वर्षाखालील बुद्धिबळपटू
1) अथर्व तावरे इचलकरंजी 2) आदित्य चव्हाण सांगली 3) प्रज्वल वरुडकर कोल्हापूर 4) विक्रमादित्य चव्हाण सांगली 5) सोहम शेटे बार्शी
उत्कृष्ट अकरा वर्षाखालील बुद्धिबळपटू
1) कश्यप खाकरीया सांगली 2) अभय भोसले जांभळी 3) सान्वी गोरे बार्शी 4) रियार्थ पोद्दार इचलकरंजी 5) अद्विक फडके सांगली
उत्कृष्ट नऊ वर्षाखालील बुद्धिबळपटू
1) शौर्य बगाडिया इचलकरंजी 2) वरद पाटील बस्तवडे 3) वेदांत बांगड इचलकरंजी 4) अर्णव पाटील कोल्हापूर 5) सिद्धांत थबज बेळगाव
उत्कृष्ट सात वर्षाखालील बुद्धिबळपटू
1)अन्वेषा सोनी इचलकरंजी 2)सुरज सलगर इचलकरंजी 3) प्रज्ञेश घोरपडे कोल्हापूर

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.