WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा कोल्हापूर शहराशी सुसंगत असाच तयार करावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणांच्या विकास आराखड्यांचा अभ्यास करा

कोल्हापूर – कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणात येणाऱ्या ४२ गावांचा विकास आराखडा तयार करताना तो कोल्हापूर शहराशी सुसंगत असेल, याची काळजी घ्यावी. त्यासाठी नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणांच्या विकास आराखड्यांचा सविस्तर अभ्यास करावा, अशा सूचना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडीक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका उपायुक्त पंडित पाटील आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करताना इतर प्राधिकरणांच्या कामकाजाचा अभ्यास करावा किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घ्यावी. आराखड्यामध्ये रस्ते, उद्याने, आरोग्य सुविधा, शाळा, रिंग रोड, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यांचा प्राधान्याने समावेश करावा. तसेच प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमिनींचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करावी.

शासनाच्या नियमांनुसार प्राधिकरणाची समिती गठित करावी. विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी. प्राधिकरणाचे काम सुरळीत आणि गतिमान होण्यासाठी शासनस्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत, यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवावी. या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार अमल महाडीक यांनी विकास आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी यावेळी विकास आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.