ऍडमिशन घ्या…पण समाजकल्याणची ही माहितीही वाचा!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 

 

कोल्हापूर जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी – शासकीय निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : (रुपेश आठवले)
कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची आणि संधीसाधू योजना सुरू झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत, सहायक आयुक्त सचिन साळे यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. समाजकल्याण कार्यालय  कोल्हापूर यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या चार शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.

या चार निवासी शाळा पुढील ठिकाणी आहेत:

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, राधानगरी

शासकीय निवासी शाळा, गगनबावडा

शासकीय निवासी शाळा, शिरोळ

शासकीय निवासी शाळा, मसुदमाले, ता. पन्हाळा

या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच निवास, भोजन, अभ्यास साहित्य आणि सर्व मूलभूत सुविधा शासनामार्फत पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. प्रवेशासाठी खालील प्रमाणे आरक्षण ठेवण्यात आले आहे:

अनुसूचित जाती – ८०%

अनुसूचित जमाती – १०%

विमुक्त जाती/भटक्या जमाती – ५%

दिव्यांग विद्यार्थी – ३%

विशेष मागास प्रवर्ग – २%

या प्रवेश प्रक्रियेचा उद्देश ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना उत्तम भविष्यासाठी सक्षम करणे हा आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय  सचिन साळे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित शाळा किंवा जिल्हा समाजकल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

व्हिडिओ पण बघा, ऐका

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.