WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
शासन आपल्या दारी  
“कोल्हापूर ही कलानगरी, चित्रनगरी, उद्यमनगरी, क्रीडानगरीसह सहकार आणि कुस्ती पंढरी म्हणूनही ओळखली जाते. अशा या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. विविध लोक कल्याणकारी योजना तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवून त्या योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्याला मिळावा यासाठी शासन व प्रशासन अधिक गतीने काम करत आहे. विकासाच्या  दिशेने   वाटचाल   करणारा   आपला   कोल्हापूर   जिल्हा  उद्योग, सामाजिक,  शैक्षणिक, आर्थिक,  वैद्यकीय, सांस्कृतिक  आणि पर्यटन क्षेत्रात  चांगली  प्रगती   करीत  आहे.”
नियोजन समितीकडून विकास कामांसाठी निधी:-
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसाधारण योजना सन 2022-23 अंतर्गत 411 कोटीचा निधी विविध विकासाच्या कामावर खर्च करुन त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत असून या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविला जात आहे. तर सन 2023-24 अंतर्गत 480 कोटीचा विकास निधी मंजूर झाला असून आरोग्य विषयक सुविधा बळकटीकरणासाठी 58 कोटी, नावीन्यपूर्ण योजनेसाठी 15 कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा – 2 साठी 26 कोटी, पर्यटन विकासासाठी 40 कोटी, गड किल्ले, मंदिरे व महत्वाची सुरक्षित स्मारके इत्यादीचे संवर्धन करण्याकरिता 13 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
शेतकरी उत्पादक कंपनीसाठी अनुदान:-
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मधमाशी पालन, रेशीम शेती व शेळीपालन हे शेतीपूरक व्यवसाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच अनुषंगाने नाबार्डच्या पुढाकाराने भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे मध उद्योग, चंदगड तालुक्यातील बसरगे येथे रेशीम उद्योग तर हातकणंगले तालुक्यात शेळीपालनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येत आहे. यासाठी नाबार्डकडून 30 लाखाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या कंपनीच्या माध्यमातून तिन्ही उद्योग व्यवसायाला चालना मिळेल व या कंपन्या त्यांच्या उत्कृष्ठ कामाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण करतील.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना:-
राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सात ठिकाणी ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्यात येत आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दवाखान्याचे डिजिटल अनावरण 1 मे 2023 रोजी करण्यात आले. यामध्ये मोफत तपासणी, मोफत औषध उपचार व मोफत औषधांचा समावेश आहे. गोरगरीब, मजूर, कष्टकरी लोकांसाठी बाह्यरुग्ण विभागाची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 अशी ठेवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना राज्य शासनाच्या वतीने मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
समाज कल्याण कडून 114 कोटीचा निधी खर्च:-
अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सन 2022 या आर्थिक वर्षात सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत मागासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांसाठी 114 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील प्रांगणामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द प्रभागातील 200 विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका निर्माण करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांमधील वर्गांचे रुपांतर डिजिटल क्लासरुममध्ये करण्यात आले आहे. तसेच शासकीय निवासी शाळा वस्तीगृहामध्ये ई- लायब्ररी सारखे प्रकल्प राबविण्यात आले आहेत.
छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण :-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण व इतर कामांसाठी 9 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर केला आहे. समाधी स्थळाची जागा सामाजिक न्याय विभागाच्या नावावर असण्याबाबतची अटही शिथिल करण्यात आली असल्याने समाधी स्थळाच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली हे काम लवकरच पूर्ण होईल.
नागरिकांना आनंदाचा शिधावाटप:-
राज्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण विभागाकडून दिवाळी, गुढीपाडवा, रमजान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सर्व सण उत्सवाच्या काळात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. त्याची आपल्या जिल्ह्यातही तत्परतेने अंमलबजावणी करुन या अंतर्गत रवा, चनाडाळ, साखर व तेल हे साहित्य शंभर टक्के पोहोचले असून सर्वांपर्यंत वाटप झाले आहे. याप्रकारे शासनाने सण उत्सवाच्या काळात सर्वसामान्य लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करुन त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी औद्योगिक वसाहत:-

राज्य शासनाकडून जिल्ह्यातील शाहूवाडी येथे नव्या औद्योगिक वसाहतीला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. शाहूवाडी हा दुर्गम तालुका असून येथील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत होते. पुढील काळात या तरुणांना आपल्या भागातच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ही औद्योगिक वसाहत मैलाचा दगड ठरेल. तर मजले ता. हातकणंगले येथे ड्रायपोर्ट होणार आहे. जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमधील पायाभूत सोयी सुविधांसाठी 120 कोटीचा निधीही उद्योग विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमधील उद्योगांना अधिक चांगल्या व दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध होतील.
जलसिंचन सुविधा:-
जिल्ह्यात जलसंपदा विभागामार्फत सोनुर्ले ता. शाहुवाडी, उचंगी ता. आजरा व नागनवाडी ता. भुदरगड या लघु प्रकल्पाच्या घळभरणीची कामे 2022 मध्ये पूर्ण करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे माहे जून 2022 पर्यंत 2 हजार 680 हेक्टर सिंचन निर्मिती झाली असून या तिन्ही प्रकल्पात 20 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या तीनही प्रकल्पाच्या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होत आहे.
शहराला पाणीपुरवठा:-
कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी 425 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. सद्यस्थितीत या योजनेचे 93 टक्के काम पूर्ण झाले असून सन 2045 च्या प्रस्तावित लोकसंख्येवर आधारित दरडोई 135 लीटर प्रतिदिन पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेची उर्वरित कामे अधिक गतीने सुरु असून लवकरच पूर्ण होतील. ही सर्व कामे पूर्ण करुन कोल्हापूर शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी:-
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून कोल्हापूर महापालिकेने कसबा बावडा व दुधाळी येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दोन स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये दररोज 102 कोटी लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शहरातील मोठे नाले व ड्रेनेजमधील मैला या प्लांटमध्ये प्रक्रिया करुन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषाप्रमाणे प्रक्रिया केलेले सांडपाणी काही प्रमाणात शेतीसाठी वापरुन नदीकडे सोडण्यात येते. यामुळे कोल्हापूर शहराच्या खालील गावांचा प्रदूषित पाणी उचलण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे.अमृत-1 अभियान अंतर्गत कोल्हापूर शहरात दुधाळी झोनमध्ये 66 किलोमीटर ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून कसबा बावडा व दुधाळी येथे जादा सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. अमृत-2 योजनेमध्ये संपूर्ण उर्वरित शहरामध्ये ड्रेनेज व्यवस्थापन करण्यासाठी 320 कोटीच्या प्रस्तावांना राज्य शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. अंतिम प्रशासकीय मान्यता लवकरच प्राप्त होईल व उर्वरित कामांना सुरुवात होऊन पंचगंगा नदी पुढील 2-3 वर्षात शंभर टक्के प्रदूषण मुक्त केली जाणार आहे.  
शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 625 कोटीचे वाटप:-
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ प्रती शेतकरी 50 हजार देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 71 हजार 782 इतक्या शेतकऱ्यांना 625 कोटी रुपयांची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येऊन त्यांना शासनाच्या वतीने दिलासा देण्यात आला आहे. तर डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज व्याज सवलत योजनेअंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात साडेतीन लाख शेतकऱ्यांना 56 कोटीच्या लाभाची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
कृषि विषयी योजना:-
      राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके अंतर्गत पीक प्रात्यक्षिके, कृषी अवजारे, शेतकरी प्रशिक्षण, पीक संरक्षण, औषधे, प्रमाणित बियाणे वितरण इत्यादी बाबत जवळपास 17 हजार शेतकरी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून यावर 1 कोटी पेक्षा अधिकचा निधी खर्च झाला आहे. हेक्टरी 125 टन ऊस उत्पादकता वाढ अभियानांतर्गत 348 जिल्हा अंतर्गत शेतकरी सहलीद्वारे जवळपास 17 हजार 400 शेतकऱ्यांना सहलीच्या माध्यमातून इतर प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन ऊस पिकाच्या उत्पादन वाढीबाबत माहिती देण्यात आली.
  आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्यामधील पोषण मूल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. 
आरोग्यविषयक सुविधांची निर्मिती:-
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अद्ययावत मिल्क बँक स्थापित करण्यात आली आहे. या बँकेचा नवजात बालकांना अत्यंत उत्कृष्टपणे फायदा होत आहे. तसेच महाविद्यालयात नव्याने 1 हजार 100 खाटांचे रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून क्ष-किरणशास्त्र विभागामध्ये अत्यंत आधुनिक अशी डी. आर. सिस्टीम प्राप्त झाली आहे. या सुविधेमुळे कॅसेट शिवाय एक्सरे काढता येतो, आजाराचे अचूक निदान करण्यास मदत होते. दिवसाला सर्वसाधारण 500 एक्सरे काढता येतात. तसेच अत्यावस्थ असलेल्या रुग्णाला स्ट्रेचरवरुन न हलवता एक्स-रे काढता येतो. या सुविधेमुळे रुग्णांना अधिक गतीने आरोग्य उपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. 

सोनं द्या लोन संपवा!आजच कर्जमुक्त व्हा!
रोहयो अंतर्गत रोजगार निर्मिती:-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सन 2022 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 3 लाख 96 हजार मनुष्य दिनाचे लक्ष प्राप्त झाले होते तर जिल्ह्याने 4 लाख 16 हजार मनुष्यदिन रोजगार निर्मिती केली. यावर 14 कोटी 74 लाख इतका खर्च करण्यात येवून जिल्ह्यातील अकुशल, कुशल बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. यावर्षी 3 लाख 68 हजार मनुष्य दिनाच्या निर्मितीचे लक्ष प्राप्त झाले असून जास्तीत जास्त मनुष्य दिन रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे.
बेघर नागरिकांसाठी शासनाकडून घरकुल:-
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्याला 2016-17 पासून आज अखेर पर्यंत 17 हजार 685 घरकुल पूर्ण झाली आहेत. तर राज्य पुरस्कृत रमाई, अटल, बांधकाम कामगार आवास, धनगर आवास योजना तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत 13 हजार 234 घरकुले अशी एकूण 30 हजार मंजूर घरकुलांपैकी 23 हजार 906 घरकुले पूर्ण झाली आहेत. 
कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसाठी निधी:-
राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन या केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांतर्गत आपल्या जिल्ह्यासाठी कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसाठी 3 कोटी 40 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली असून 240 कारागिरांना समाविष्ट करुन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. हा उपक्रम राज्यात प्रथमच राबविला जात आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत 1205 योजनांसाठी 1322 कोटीचा निधी:-
या अंतर्गत 6 लाख 78 हजार कुटुंबापैकी 5 लाख 58 हजार कुटुंबांना कार्यात्मक नळ जोडणी देण्यात येणार आहे. ‘हर घर नल से जल’ या घोष वाक्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांला नळाद्वारे शुद्ध व सुरक्षित पाणी दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 205 योजनांसाठी 1 हजार 322 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जनजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या योजनांची कामे सुरु असून हे प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक नागरिकाला 55 लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाण्यासाठी होत असलेली भटकंती संपणार आहे.
शहरातील रस्त्यासाठी 200 कोटीचा निधी:-
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची महापूर व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला तात्काळ दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. तर संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नवीन रस्त्यांसाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून 100 कोटीचा निधी मंजूर केलेला होता तर त्यात आणखी 90 कोटी रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत. या निधीतून कोल्हापूर शहरातील सर्व रस्त्यांची कामे करण्यात येऊन नागरिकांना चांगले व उत्कृष्ट रस्ते उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
क्रीडा क्षेत्र:-
क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यातील खेळांचा विकास पाहता अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी बजावून कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवलेला आहे. नुकतेच बालेवाडी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी 44 सुवर्ण, 42 रौप्य व 37 कांस्य असे एकूण 127 पदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. कोल्हापुरात विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम लवकर पूर्ण करून कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी अद्यावत क्रीडा सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी क्रीडा विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत.
पर्यटन विकास:-
जागतिक पर्यटनाच्या नकाशावर कोल्हापूर जिल्हा आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पर्यटकांना आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांसाठी टॉयलेट तसेच पार्किंगची व्यवस्था नव्याने निर्माण केली जात आहे. पंचगंगा नदी घाटाची दुरुस्ती करून हा घाट पर्यटकांना आकर्षित करेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शाहू मिल परिसरात शाहू स्मारक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्याचे नियोजित आहे. तसेच ओल्ड पॅलेस ते न्यू पॅलेस दरम्यानचा रस्ता हा हेरिटेज पथ म्हणून विकसित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याची फार मोठी ऐतिहासिक परंपरा असून त्या परंपरेचे जतन करुन राज्य, देश व जागतिक स्तरावरील पर्यटक या ठिकाणी येऊन येथील माहिती जाणून घेतील यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. या सर्व सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

बाईक खरेदी करायची तर इथंच
पंचमहाभूत लोकोत्सव:-
जागतिक स्तरावर वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाचा असमतोल निर्माण झालेला आहे व हा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. आपला देश व राज्य ही पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपयोजना करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे कनेरी मठ संस्थान पंचमहाभूत लोकोत्सव 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राबविण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यातून जिल्हा, राज्य, देश व जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगण्यात आले. या महोत्सवासाठी लाखो लोकांनी हजेरी लावून पर्यावरण विषयक माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचा पर्यावरण विभाग व जिल्हा प्रशासन सक्रिय सहभागी झाले होते. यासाठी आवश्यक निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन उपरोक्त प्रमाणे विविध योजना राबवत असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. राज्यात व देशात कोल्हापूर जिल्हा विकासात कायमस्वरुपी अग्रेसर राहावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे.
सुनील सोनटक्के
जिल्हा माहिती अधिकारी 
कोल्हापूर.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.