एप्रिल 2019 मध्ये आरोपी विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
कोल्हापूर : आजीवन कारावास तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा असलेल्या केस मधून आरोपी किरण अतिश बजंत्री याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. एप्रिल 2019 मध्ये आरोपी विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विरुद्ध सबळ पुरावा असल्याने त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सदर केस मध्ये सरकारी पक्षातर्फे आरोपीच्या दोषसिद्धी साठी जोरदार मांडणी करण्यात आली होती परंतु आरोपीचे वकील सतिश कुंभार व भारत सोनूले यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा प्रमुख न्यायाधीशसो अग्रवाल साहेब यांनी दि 28 जून रोजी सर्व आरोपांतुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सदर आरोपी तर्फे ऍड. सतिश कुंभार, भारत सोनूले, सारंग कुराडे यांनी काम पाहिले तर प्रिती देवर्डेकर, सरोज देसाई व आकाश साठे यांचे सहकार्य लाभले.
सदर केस गेले 5 वर्षांपासून जिल्हा विशेष न्यायाधीशसो यांचेकडे प्रलंबित होती परंतु आरोपीचे वकीलानी जून 2023 मध्ये सदर कामी वकीलपत्र दाखल करून केवळ 28 दिवसांत सदर केस निकाली केली आहे. |