मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी स्वागत…
कोल्हापूर – केंद्र सरकारचे हे ब्राॅडकास्ट विधेयक डिजिटल ब्रॉडकास्टर तसेच इंडिव्हिज्युअल कॉन्टेट क्रिएटर्स चा आवाज बंद करणारे होते. या विधेयकातील अनेक तरतुदी डिजिटल मिडियाचा गळा घोटणा-या असल्याने देशभरातील पत्रकारांचा यास तीव्र विरोध केला होता.
मीडिया असोसिएशन ऑफ इंडियानेही या विधेयकास कडाडून विरोध केला होता. अखेर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मागे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वांशी चर्चा करून या विधेयकाचा नवा मसुदा तयार करण्यात येणार असल्याचे वैष्णव यांनी जाहीर केले.
या भूमिकेचे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी स्वागत केले असून, प्रसार माध्यम स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही, लोकांचा समाजमाध्यमे व डिजिटल माध्यमांना मिळणारा मोठा प्रतिसाद पाहूनच तो आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले होते. मात्र असे करणे धोकादायक ठरु शकते . त्याचे पडसाद जनतेत उमटू शकतात याची जाणीव झाल्यानेच सरकारने हे विधेयक अखेर मागे घेतले आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्योत्तर विजय आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.