पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…
कोल्हापूर – डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभाग सुरू करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनीयुक्त असलेल्या महिलासाठीच्या या स्वतंत्र विभागाचे उद्घाटन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौ. पूजा ऋतुराज पाटील आणि सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजचा 35 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिलासाठीचा या स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभागाचा शुभारंभ करण्यात आला. अत्यंत अनुभवी डॉक्टर, परिचारिका आणि रुग्ण सहाय्यक, कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध असतील. या विभागात 120 बेड असून यातील 60 बेड हे प्रसुती विभागासाठी आहेत. या विभागात 15 तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, अद्यावत व्हेंटिलेटर, विविध अतिदक्षता विभाग व अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून होणार असल्याची माहिती सौ. पूजा ऋतुराज पाटील व सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांनी दिली. दरम्यान, हॉस्पीटलमध्ये मोफत प्रसूती सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी यावेळी दिली. यामध्ये नैसर्गिक प्रसूती, सिझेरियन, जोखमीच्या प्रसूती आदी सर्व सेवा व औषधोपचार पूर्णपणे मोफत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या विभागाच्या उद्घाटन प्रसंगी नव्यान सुरु झालेल्या या विभागाच्या उद्घाटन प्रसंगी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपप्राचार्य डॉ. आशालता पाटील, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, डॉ. शीतल मिरचुटे, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, उपकुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे डायरेक्टर डॉ. अजित पाटील, नर्सिंग कॉलेज प्राचार्य डॉ. उमारणी जे., फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, फ़िजिओथेरपी प्राचार्य डॉ. अमृत कुंवर रायजादे, हॉस्पिटलीटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, डॉ. आर. एस. पाटील, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, मेडिकल कॉलेजचे विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.