बुधवारी १४ आँगस्ट रोजी नरतवडे येथे रानभाजी महोत्सव…
सरवडे प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या कृषी व आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे व स्वर्गीय सुशिलादेवी आबिटकर फौंडेशनच्या वतीने नरतवडे ता. राधानगरी येथील जयभवानी कार्यालयात रानभाजी महोत्सव तसेच ऊस पिक स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ बुधवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रृतिका नलवडे यांनी दिली.
शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचा रान महोत्सव राधानगरी तालुक्यातप्रथमच आयोजित करण्यात आला असून विविध प्रकारच्या तसेच दुर्मिळ अशा रानभाज्या या ठिकाणी पहावयास मिळणार आहेत. या महोत्सवात बचत गटासह स्थानिक महिला ही सहभागी होणार असून कांही रानभाज्यांची चव देखील याठिकाणी चाखता येणार आहे. तर विविध रानभाज्या विक्रीसाठी देखील ठेवल्या जाणार आहेत.
तसेच एकरी ६० टन ऊस उत्पादकता वाढ अभियान अंतर्गत ऊस पीक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार असून विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर असणार आहेत. तर विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, अशोकराव फराकटे, अजय कुलकर्णी, रक्षा शिंदे, अशोककुमार पिसाळ, अरुण भिंगारदेवे, प्रविण आवटे, जयवंत जगताप, आनंदा शिंदे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.