नागाव येथे पैसे स्विकारताना पकडले…
शिरोली – नागाव ता. हातकणंगले येथे टोप येथील भुअभिलेख कार्यालयतील अधिकारी तुषार महादेव सोनवणे ४५ (पद परीक्षण भुमी अभिलेख कार्यालय हातकणंगले भु मापन केंद्र टोप सज्जा मुळ गाव बामनोळी) आणि खाजगी फंटर अमर विक्रम चौगुले ४२ (रा. हातकणंगले ता. हातकणंगले) या दोघांना कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चार हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
मिळालेली माहिती अशी अंबप या. हातकणंगले येथील एका नागरिकाने वारसा हक्क नोंदणी करण्यासाठी अर्ज केला होता. या नाव नोंदणी करिता सोनवणे यांने आठ हजारांची मागणी केली होती . चर्चे अंती मागणी ८ हजारांची तडजोड ४ हजारावर झाली . संबंधित व्यक्तीने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पथकाने या लाचखोर अधिकारी व फंटर ला पकडण्यासाठी सापळा लावला होता नागाव येथे एका जमिनीची मोजणी करण्यासाठी सोनवणे नागाव गावात आला होता . तक्रारदारास नागाव येथे पैसे घेऊन बोलविले आणि ज्या ठिकाणी मोजणी केली जात होती त्या ठिकाणी लाचेची रक्कम स्विकारली या कारवाईमुळे नागाव सह परिसरात खळबळ माजली आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक असलेल्या बापू साळुंखे यांच्या पथकाने केली त्यांच्या कडे अतिरिक्त कार्यभार पो. अधिक्षक कार्यभार देण्यात आला आहे. या पथकामध्ये साहय्यक फौजदार प्रकाश भंडारे. सुनील मोरे. हवालदार विकास माने सुनील घोसाळकर व सुधीर पाटील यांचा समावेश होता. सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या कारणांनी वेठीस धरून पैशाची मागणी करणार्या कर्मचार्यावर कारवाई होण्यासाठी नागरीकांनी खालील. मो. क्र . ७३०४७६९२३० यांवर संपर्क साधा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पोलिस निरीक्षक बापू साळुंखे यांनी आवाहन केले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.