विनायक जितकर
कृषी विभाग व स्वर्गीय सुशीलादेवी आबिटकर फाउंडेशनचा उपक्रम…
सरवडे – महाराष्ट्र शासनाच्या कृषी व आत्मा विभाग कृषी विज्ञान केंद्र तळसंदे व स्वर्गीय सुशीलादेवी आबिटकर फाउंडेशन च्या वतीने नरतवडे तालुका राधानगरी येथील जय भवानी कार्यालयात रानबाजी महोत्सव तसेच ऊस पिक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ बुधवार 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलावडे यांनी दिली.
शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचा रान महोत्सव राधानगरी तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आला असून विविध प्रकारच्या तसेच दुर्मिलाच्या रानभाज्या या ठिकाणी पहावयास मिळणार आहेत या महोत्सवात सुमारे 40 ते 50 बचत गट यामध्ये सहभागी होणार असून काही रानभाज्यांचे चव देखील या ठिकाणी चाखता येणार आहे तर विविध रानभाज्या विक्रीसाठी देखील ठेवल्या जाणार आहेत तसेच एकरी 60 टन ऊस उत्पादक वाढ अभियान अंतर्गत ऊस पीक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार असून विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आंबेडकर असणार आहेत. तर विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, अशोक फराकटे, अजय कुलकर्णी, रक्षा शिंदे, अशोककुमार पिसाळ, अरुण भिंगारदिवे, प्रवीण आवटे, जयवंत जगताप, आनंदा शिंदे उपस्थित राहणार आहेत. या दुर्मिळ महोत्सवास उपस्थित रहावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.