महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची पुनर्नियुक्ती

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राज्य शासनाकडून अधिकृत अधिसूचना जारी; पुढील तीन वर्षांसाठी कार्यकाळ

कोल्हापूर – महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम, २०२३’ अंतर्गत शेखर मीना रामबिलास मुंदडा यांची ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’च्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) पुनर्नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील अधिकृत राजपत्र अधिसूचना राज्य शासनाचे सह सचिव नि. भा. मराळे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.  राज्य शासनाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र गोसेवा अधिनियम, २०२३ च्या कलम ३ (४) मधील तरतुदींनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ही नियुक्ती करण्यात आली आहे. अधिसूचनेतील कलम ४ (१) मधील तरतुदींनुसार अध्यक्षांचा कार्यकाळ शासकीय राजपत्रात ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. 

पुणे येथील रहिवासी असलेले शेखर मुंदडा यांनी यापूर्वीही गोसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला असून, राज्यातील गोवंश संरक्षण, संवर्धन, आणि गोशाळांच्या सक्षमीकरणासाठी मोलाचे योगदान दिले आहे. २२ जून ते ५ जुलै या काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेमुळे राज्यभरातील गोशाळा संचालक, गोसेवक व गोपालक यांच्यासह जनतेमध्ये गोसंवर्धन व सरंक्षणाबाबत प्रभावीपणे जनजागृती झाली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची व अनुभवाची दखल घेत राज्य शासनाने पुन्हा एकदा त्यांच्यावर महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

या उद्दिष्टांची करणार प्रभावी अंमलबजावणी

• ब्राऊन रिव्ह्युलेशन (शेण व मुत्रापासून तयार उपउत्पादने) चळवण व्यापक करणे. 

• ‘गो-10’ ब्राण्ड अंतर्गत गोमय उत्पादनांचे विक्री व्यवस्थापन व मुल्यसाखळी विकसित करणे

• गोशाळांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विशेष कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

• गोसंवर्धन, संरक्षण व संगोपनाबाबत व्यापक जनजागृती करणे

गोवंश संरक्षणाला मिळणार गती

शेखर मुंदडा यांच्या पुनर्नियुक्तीमुळे राज्यातील देशी गोवंशाचे रक्षण, गोशाळांचे व्यवस्थापन, चारा उत्पादन, आणि गो-उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या योजनांना अधिक गती मिळेल, असा विश्वास पशुसंवर्धन व गोसेवा क्षेत्रातील घटकांकडून व्यक्त केला जात आहे.

देशी गोवंशाचे संरक्षण व गोशाळांचे सक्षमीकरण हेच मुख्य ध्येय

शेखर मुंदडा म्हणाले, राज्य शासनाने माझ्यावर पुन्हा एकदा दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे व राज्य सरकारचा अत्यंत आभारी आहे. महाराष्ट्रातील देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन करणे, राज्यातील गोशाळांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे व ‘गो- 10’ ब्राण्ड अंतर्गत गोमय उत्पादनांना प्रोत्साहन देणे ही आमची मुख्य प्राथमिकता राहील. शेतकरी, पशुपालक आणि गोसेवकांच्या सहकार्याने गोसेवा आयोगाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवून गोवंश संरक्षणाच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.