आता भिजायचं नायं! अन् भिजून आजारपण पण नाय !

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाजाच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘छत्रसखी’ उपक्रमाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. वसंत कदम. समवेत डॉ. किरणकुमार जोहरे, संदीप नाठे, डॉ. ज्ञानेश्वर सातभाई, प्रा. दिलीप माळोदे, प्रा. ऋतुजा जाधव, प्रा. निलम उफाडे, प्रा. भगवान कडलग, डॉ. अरुण भगरे आदी.*

पिंपळगावच्या क. का. वाघ महाविद्यालयात अनोख्या उपक्रमाला सुरुवात; आता भिजायचं नायं! अन् भिजून आजारपण पण नाय !

नाशिक: ‘विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहिले, तर त्यांचे शिक्षणही अखंड सुरू राहील. एकही विद्यार्थी किंवा कर्मचारी पावसामुळे भिजून आजारी पडू नये; त्यासाठीच ‘छत्रसखी’ हा उपक्रम सुरू केला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत बी. कदम यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाजाच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी-केंद्रित, सामाजिक जाणीवेने प्रेरित आणि अत्यंत नाविन्यपूर्ण ‘छत्रसखी’ उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.


‘छत्रसखी’ या उपक्रमांतर्गत विनामूल्य छत्र्या विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पावसात अचानक अडकलेल्या विद्यार्थ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना महाविद्यालयातून छत्री घेऊन संपूर्ण कॅम्पसमध्ये वापरण्याची, तसेच घरी किंवा बसस्थानकापर्यंत घेऊन जाऊन दुसऱ्या दिवशी परत करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पावसात भिजून होणारे आजार, अनावश्यक अनुपस्थिती आणि त्यातून होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
विद्यार्थीहिताची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी जपत इलेक्‍ट्रॉनिक सायन्स विभागातील प्राध्यापक डॉ. किरणकुमार प्रेमचंद जोहरे यांच्या संकल्पनेतून तसेच वैयक्तिक योगदानातून ‘छत्रसखी’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन भविष्यात छत्र्यांची संख्या दरवर्षी इतर प्राध्यापकांच्या सहयोगाने वाढविण्यात येईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. वसंत कदम यांनी दिली. महाविद्यालयावर कुठलाही आर्थिक भार पडत नसल्याने माझे विद्यार्थी माझे महाविद्यालय या बिलॉंगिंगनेसच्या भावनेतून राबविले जाणारे हे उपक्रम कौतुकास्पद आहेत असे प्राचार्य डॉ. कदम उद्घाटन प्रसंगी म्हणाले.
‘छत्रसखी’ हा उपक्रम केवळ छत्री देण्यापुरता मर्यादित नाही; तो विद्यार्थ्यांवरील प्रेम, विश्वास, संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी आणि नियमित शिक्षणाची हमी देण्याच्या दिशेने उचललेले हे एक मोलाचे पाऊल असून, महाविद्यालयाची ही अभिनव ‘बेस्ट प्रॅक्टिस’ इतर शैक्षणिक संस्थांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी महाविद्यालयातील संदीप नाठे, डॉ.ज्ञानेश्वर सातभाई, प्रा.दिलीप माळोदे, प्रा. ऋतुजा जाधव, प्रा. निलम उफाडे, प्रा. भगवान कडलग, डॉ.अरुण भगरे आदी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*नाशिक : मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाजाच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘छत्रसखी’ उपक्रमाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. वसंत कदम. समवेत डॉ. किरणकुमार जोहरे, संदीप नाठे, डॉ. ज्ञानेश्वर सातभाई, प्रा. दिलीप माळोदे, प्रा. ऋतुजा जाधव, प्रा. निलम उफाडे, प्रा. भगवान कडलग, डॉ. अरुण भगरे आदी.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.