तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे स्वर्गीय माधुरी दत्ताराम घुगे स्मृतिप्रित्यर्थ पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु. गायत्री सरला दिनेश घुगे यांचा जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. तसेच यावेळी लेखक मंगेश मसुरकर संग्रहित जेष्ठ पत्रकार दत्ताराम घुगे यांच्या चरित्र ग्रंथ बायोस्कोपचे प्रकाशन देखील करण्यात आले.
गायत्री घुगे या गेल्या चार वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात काम करतं आहेत. खूप कमी वयात त्यांनी या क्षेत्रात काम करुन नावलौकिक मिळवला आहे. आपल्या लेखणीने आणि कौशल्याने गायत्री घुगे यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. महिलांचे विषय असतील अथवा सामाजिक आपल्या लेखणीतून त्यांनी अगदी प्रखरतेने मांडणी केली आहे. अनेक सेलेब्रिटी व्यक्तींच्या मुलाखती देखील त्यांनी घेतल्या आहेत. त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना अनेक ठिकाणी त्यांचा सन्मान देखील केला गेला आहे.
१६ मार्च राेजी मुंबईतील दहिसर पुर्व मधील विठ्ठल मंदिरातील स्वामी माधवेंद्र सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. प्रमूख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी १० वाजता या कार्यक्रमास सुरुवात झाली. दत्ताराम घुगे यांच्या सौभाग्यवती स्व.माधुरी दत्ताराम घुगे यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गायत्री घुगे यांच्या सह समाजातील १८ अनेक महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.