कोल्हापूर- प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर, हिरकणी फाऊंडेशन व कोल्हापूर जिल्हा वाहन वितरक संघटना यांच्यामार्फत जागतिक महिला दिन व रस्ते सुरक्षा जनजागृती निमित्त रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथून महिलांसाठी कार व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून सकाळी 9 वाजता निघणाऱ्या या कार व बाईक रॅलीमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी केले आहे.
रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/pink-carrally-100332 या संकेतस्थळावर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नाव नोंदणी करता येणार आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत 200 बाईक आणि 100 कारची नोंदणी झाली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली आहे. |
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.