WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी पर्यावरण मित्र सौ. श्वेता शिंदे

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कॉलेजमध्ये आयोजित आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना पर्यावरण विषयक मार्गदर्शन

शिराळा / प्रतिनिधी : पर्यावरणाने आपल्याला निःशुल्क दिलेल्या अनेक घटकांचा पुरेपूर वापर करतो, पण त्याचे ऋण फेडत नाही पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी असल्याचे मत पर्यावरण मित्र सौ. श्वेता शिंदे यांनी व्यक्त केले. त्या चिखली (ता.शिराळा) येथे देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कॉलेजमध्ये आयोजित आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना पर्यावरण विषयक मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

 

सौ. शिंदे पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रम होतात. संयोजक उपस्थितांना काही ना काहीतरी भेटवस्तू देत असतात. ही प्रथा बंद करून अशा वेळी औषधी वनस्पती भेट वस्तू म्हणून देण्याची प्रथा चालू ठेवणे गरजेचे आहे. शहरी भागातील अनेक ठिकाणे विविध उद्योगधंद्यामुळे प्रदूषित झाली आहेत. परंतु ग्रामीण भागातील काही ठिकाणे आजही पर्यावरणाची गुणवता राखून आहेत. त्याचे पावित्र्य राखण्याचा देखील प्रयत्न आपणा सर्वांकडून होणे गरजेचे आहे. तसेच शेतीमध्ये रासायनिक खतांचा होत असलेला वारेमाप वापर यामुळे पिकांचा त्याचबरोबर जमिनीचा दर्जा देखील ढासळत चालला आहे.

वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, पाणी बचत, यासारखे उपक्रम तसेच, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा कृती करुन पर्यावरण वाचवा या अभियानाचा प्रत्येकाने भाग बनणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वर्षभरात अनेक उत्सव विविध ठिकाणी होत असतात. असे उत्सव साजरे करताना देखील पर्यावरण पूरक साजरे करणे काळाची गरज आहे.

दरम्यान आपदा प्रशिक्षण कार्यक्रमात परिसरातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, महसूल विभागाचे कर्मचारी, एन.आय.सी.चे विद्यार्थी, होमगार्ड सहभागी झाले होते. तसेच प्रशिक्षणासाठी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच तहसिलदार गणेश शिंदे, नायब तहसिलदार अ. द. कोकाटे, महसूलचे कर्मचारी दिपक पारधी, सचिन बने यांचेही सहकार्य लाभले. प्रशिक्षक म्हणून दिया केन, रीना रॉय यांच्यासह अनेक कर्मचारी दिपक जाधव, किरण फातले आदि उपस्थित होते.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी