WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापूर महापालिकेचे आऊटकम बजेट प्रसिद्ध करा, अन्यथा अर्थ परिषदेचे आयोजन : ‘आप’

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

विनायक जितकर

बजेट म्हणजे ‘मागील पानावरुन पुढे’ फक्त आकड्यांचा पाऊस : आप’ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई

आगामी आर्थिक वर्षासाठी महापालिकेने बजेट सादर केले. तब्बल 1153 कोटींचे बजेट असल्याचे सांगत 754.44 कोटींचे महसुली व भांडवली जमा करण्याचे उद्धिष्ट असल्याचे पालिकेने सांगितले. अर्थसंकल्पात आकड्यांचा पाऊस पाडला गेला असला तरी प्रत्यक्षात मात्र उत्पन्नाचा दुष्काळ असल्याचे चित्र आहे. महसुली उद्धिष्ट गाठण्यात प्रशासन अपयशी प्रशासकांकडे संपूर्ण कारभार आल्यानंतर प्रशासनात तत्परता येईल असे अपेक्षित असताना मागील तीन वर्षात महसुली उद्दिष्टाच्या सरासरी 80 टक्केच महसुल जमा होत आहे.

बजेट ‘मागील पानावरुन पुढे’; मागील बजेटमधील योजना अपूर्णच कन्स्ट्रक्शन वेस्ट (डेब्री) विल्हेवाट प्रकल्प, एनिमल शेल्टर, महिलांसाठी स्वतंत्र जिम, आय टी पार्क, शहरात ट्रॅफिकसाठी पार्किंग मॅप या योजना मागील बजेटमध्ये नमूद होत्या. या योजनांवर कोणतेही काम झाले नाही. चालू वर्षीच्या बजेटमध्ये या योजना वगळण्यात आल्या आहेत.

पाणीपुरवठा एएमआर मशीन, व्हर्टिकल गार्डन, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, बोटॅनिकल गार्डन, पर्यटनवाढीसाठी खासबागेत प्रायोगिक कुस्ती, मैदानी खेळ प्रदर्शन, आनंदवाचन कक्ष, वॉटरलेस युरिनल हे प्रकल्प ‘मागील पानावरुन पुढे’ ओढले आहेत. मागील वर्षीच्या बजेटमध्ये तरतूद करून देखील काम सुरू न झालेले हे प्रकल्प महापालिका प्रशासनाच्या बजेटचा फोलपणा अधोरेखित करतो. उत्पन्नवाढीसाठी प्रकल्प नाहीत महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल यासाठी रोडमॅप अपेक्षित असताना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने एकही ठोस प्रकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात नाही.

प्राथमिक शिक्षण, म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या योजना कागदारवरच

महापालिका शाळेतील 40 विद्यार्थ्यांना इस्रो सारख्या वैज्ञानिक संस्थांमध्ये सहलीला नेण्यासाठी प्राथमिक शिक्षण समितीने मागील बजेटमध्ये तरतूद केली होती. पण निधीअभावी ही सहल जाऊ शकली नाही. म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या योजना देखील कागदावर राहिल्या आहेत. महिला व बालकल्याण मधून दोन बसेस घेण्याचे नियोजन असताना त्यावर पुढे काही झाले नाही. मोबाईल अँप, ई-तिकिटिंग यंत्रणा अंमलात आणण्यासाठी मागील बजेटमध्ये तरतूद केलेली, परंतु काम अद्याप सुरू झालेले नाही.

स्वच्छतागृहे बांधणार कधी?

शहरात महिला स्वच्छतागृहे बांधण्यासाठी मागील तीन वर्षात अनुक्रमे एक कोटी, 40 लाख आणि यावर्षी 2 कोटींची तरतूद करण्यात आली. परंतु फक्त दोनच ठिकाणी महिला स्वच्छतागृहे बांधण्यात आले. बजेटमध्ये तरतूद असून देखील निधीअभावी अंमलबजावणी होणे शक्य होत नाही अशी परिस्थिती आहे.

रिक्त पदे तसेच अपुरे कर्मचारी असल्याने वसुलीवर व नवीन योजना राबवण्यावर त्याचा परिणाम होत आहे. 35% आस्थापना खर्चाची अट असल्याने या चक्रव्यूहातुन बाहेर पडण्यासाठी महापालिकेला उत्पन्नवाढीशिवाय पर्याय नाही. परंतु उत्पन्नवाढीसाठी लागणारे जलद निर्णयप्रक्रिया व धाडस करण्याची इच्छाशक्ती प्रशासनाकडे नाही. महापालिकेच्या मालकीच्या असलेले प्रमुख मार्केट व आस्थापना गहाण असल्याने अमृत 2.0 व सरोवर संवर्धनासाठी लागणारे 131 कोटींची तरतूद महापालिका कशी करणार आहे हा मोठा प्रश्न आहे.

महापालिकेने मागील बजेटची उद्दिष्टपूर्ती किती झाली हे शहरातील नागरिकांसमोर आणावे व यासाठी महापालिकेने दिल्ली सरकारच्या धर्तीवर ‘आऊटकम बजेट’ सादर करावे अशी मागणी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली.

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने येत्या 15 दिवसात रोडमॅप जाहीर करावा, अन्याथा आम आदमी पार्टीच्या वतीने अर्थ परिषदेचे आयोजन करण्यात येईल असे सांगण्यात आले. लवकर निवडणुका होऊन नवे सभागृह अस्तित्वात न आल्यास प्रशासनाच्या कारभाराला कोणताही लगाम राहणार नसल्याचे यावेळी नमूद केले गेले. यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, अमरजा पाटील, विजय हेगडे, पूजा आडदांडे, समीर लतीफ, उमेश वडर, मयूर भोसले, आदित्य पोवार, एस्थेर कांबळे, नाझील शेख आदी उपस्थित होते.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी