राधानगरी -राधानगरी येथील महसूल खात्याच्या वेगवेगळ्या तसेच सकारात्मक आणि जनतेच्या हितासाठी जनजागृती करणाऱ्या बातम्या देऊन तहसील कार्यालयाला सहकार्य केल्याबद्दल यावर्षीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विजय बकरे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
शासनाच्या विविध योजना महसूल खात्याकडे येत असतात. त्याची माहिती महसूल खात्याकडून प्रसिद्धसाठी पत्रकारांना दिली जाते. त्या अधिकाधिक वृत्तपत्र तसेच विविध न्यूज पाेर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला. त्याचा फायदा शासनस्तरावर तसेच सर्वसामान्य जनतेला हाेताे. त्यामुळे शासकीय याेजनाबाबत जनजागृती हाेण्यास मदत झाली. यामुळेच नुकत्याच झालेल्या महसूल पंधरवडा मध्ये एकूण प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आढावा घेऊन, त्या बातम्या चांगल्या प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे महसूल खात्याचे यातून नाव लौकिक झाले.
याच पाश्वभूमीवर राधानगरीचे पत्रकार विजय बकरे यांना यावर्षीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी तहसीलदार कार्यालयातील संग्राम शिंदे व कर्मचारी हजर होते. बकरे यांना मिळालेला पुरस्कार अभिनंदनास पात्र असून, त्यांचे राधानगरी तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































