WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

GOOD NEWS- मकरंद खाण्यासाठी येतात… एक वनस्पती नि ४२ फुलपाखरं

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर : दगडी पाला, कंबरमोडी, एकदांडी किंवा बंदुकीचे फूल अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि रस्त्त्याच्या कडेने, रानावनात कोठेही सहज आढळणाऱ्या वनस्पतीचे निसर्गामधील प्रयोजन शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी सिद्ध केले आहे. ट्रायडॅक्स प्रोकम्बन्स (Tridax procumbens) अर्थात दगडी पाला या तशा दुर्लक्षित वनस्पतीच्या फुलांवर मकरंद खाण्यासाठी आलेल्या ४२ प्रजातीच्या फुलपाखरांची नोंद डॉ. सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरती पाटील या संशोधक विद्यार्थिनीने केली आहे. विशेष म्हणजे या सर्व नोंदी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरामध्येच केलेल्या आहेत. त्यांचा हा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये काल (दि. २६) प्रकाशित झाला आहे.

आरती पाटील (संशोधक)

डॉ. सुनील गायकवाड

डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरती पाटील यांनी दगडी पाला या प्रजातीवर मकरंद टिपण्यासाठी वर्षभरात येणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींची अत्यंत शिस्तबद्ध निरीक्षणे करून नोंदी घेतल्या. फुलपाखरांची कोणती प्रजाती, कोणत्या कालावधीत, कोणत्या वेळी या फुलावर येते, त्यावेळचे हवामान, तापमान, आर्द्रता यांच्याही नोंदी घेतल्या. या संशोधनानुसार तृणकणी या भारतातल्या सर्वात लहान फुलपाखरासह ग्रास ज्वेल, कॉमन शॉट सिल्व्हरलाईन (रूपरेखा), पिकॉक पॅन्सी (मयूर भिरभिरी), पेंटेड लेडी (ऊर्वशी), ग्रेट एग फ्लाय, (मोठा चांदवा), पायोनिअर व्हाईट (गौरांग), कॉमन गुल (कवडशा), कॉमन क्रो (हबशी), कॉमन लेपर्ड (चित्ता) या आणि इतर अशा एकूण ४२ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद या संशोधनाअंतर्गत करण्यात आली आहे. निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक लक्षित-दुर्लक्षित प्रजातीचे तिचे स्वतःचे असे एक अस्तित्व आणि प्रयोजन असते. या विधानाची प्रचिती देणारे हे संशोधन आहे. हे संशोधन ‘अ स्टडी ऑन दि असोसिएशन बिटविन ट्रायडॅक्स डेझी ट्रायडॅक्स प्रोकम्बन्स एल. अँन्ड बटरफ्लाईज अॅट शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस (महाराष्ट्र, इंडिया)’ या शीर्षकाखाली सदर संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

 

सर्व जाहिराती एकाच पेजवर पहा, संपर्क साधा…

डॉ. सुनील गायकवाड म्हणाले की, या संशोधनामुळे दगडी पाला आणि तत्सम दुर्लक्षित वनस्पतींचे फुलपाखरांच्या तसेच जैवविविधता संवर्धनातील महत्व अधोरेखित झाले आहे. यापूर्वी दगडी पाला आणि फुलपाखरू यांच्या परपस्परसंबंधांबाबत प्रकाशित झालेल्या शोधनिबंधांत नोंद केलेल्या फुलपाखरांच्या प्रजातींपेक्षाही अधिक प्रजाती सदरच्या अभ्यासांतर्गत नोंदवल्या गेल्या आहेत. या सर्व नोंदी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ परिसराचेही जैवविविधता संवर्धनातील महत्त्व ठळकपणे सामोरे आले आहे.

 

 

‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ याविषयी…

जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा  (JoTT) हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक जैवविविधता संवर्धन आणि प्राण्यांचे वर्गीकरण यावरील शोधनिबंध प्रसिद्ध करते. दुर्मिळ व अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अनुषंगाने असलेले संशोधन यात प्राधान्याने प्रकाशित केले जाते. या नियतकालिकाचा समावेश स्कोपस, वेब ऑफ सायन्स, यूजीसी केअर लिस्ट अशा नामांकित इंडेक्सिंग एजन्सीमध्ये आहे. त्याचे नॅस रेटिंग ५.५६ इतके असून एच इंडेक्स १५ आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.