थाेडी हटके.. भाजप खासदारांच्या खांद्यावर राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्याचा भार… पाठिंबा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 

काेल्हापूर – शेखर धाेंगडे  

राजकारणात केव्हा काय घडले… हे कधीच सांगता येत नाही.. सध्या चे महाराष्ट्राचे राजकारण ज्या दिशने चाललंय ते यापूर्वी केव्हाच घडलं नव्हतं. असे जुन जानते. सांगतात. पहाटेच्या शपथ विधीपासून ते युती, महाआघाडी कस कस घडतय नि बिघडतय याचा अनुभव सातत्याने येत आहे. तर काेण काेणाच्या बाजूला बसलंय, मांडीला मांडी लावून बसतंय नि काेण काेणाचे केव्हा सारथी कसे बनतात याची उदाहरण राजकारणात दर दाेन -चार महिन्याला सुरुच असतात. आता काेल्हापूरात देखिल असाच एक राजकीय किस्सा घडलाय. नि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.. भाजपच्या खांद्यावर राष्ट्रवादीचा हात म्हणा किंवा. भाजपच्या खासदारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा म्हणा.राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांचे भाजपचे जणू काही येथे खासदार सारथी बनलेत असेही म्हणा. असाच प्रकार काेल्हापूर येथील पाेलीस क्रीडांगणावर झाल्याने दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पाेलीस प्रशासन देखिल आश्चर्य झाले. 

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

काेल्हापूर येथे राज्य नियाेजन मंडळाच्या निधीमधून काेल्हापूर पाेलिसांच्या गाड्यांचे आधुनिकीकरण करण्यात आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व आमदार पी. ए. पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्यांचे हस्तांतरण पोलीस दलाला करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नवीन बुलेट चालवून वाहनांचे उद्घाटनही केले. जिल्हा नियोजन कडून 3.6 कोटी रुपयांची मंजुरी होती. त्यातील 84 लाख सध्या पोलीस विभागाला दिलेले आहेत. उर्वरीत निधी याच महिन्यात वितरीत केला जाणार आहे. यातून 11 स्कॉर्पिओ, 6 न्यू बोलेरो, 3 बोलेरो, 2 मोठ्या बस, 1 मिनी बस, 1 ट्रक, 12 ग्लॅमर आणि 4 बुलेट, 1 एसी डॉग व्हॅन मारुती इको अशी वाहने घेणार आहेत. पैकी 6 न्यू बोलेरो, 3 बोलेरो, 12 ग्लॅमर, 2 मोठ्या बस आलेल्या आहेत आणि महासंचालक कार्यालयाकडून 1 टेम्पो ट्रॅव्हलर आणि 10 टीव्हीएस आपाचे गाड्या दिलेल्या आहेत यांचा कोल्हापूर पोलीस दलाला हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम पार पडला.

मात्र, हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर तरुण व्यक्तीमत्व असलेल्या काेल्हापूर जिल्ह्याच्या खासदारांना बुलेटवर एक फेरफटका मारण्याचा  माेह आवरला नाही. त्यांनी नव्या काेऱ्या करकरीत बुलेट ला किक मारली नि अँक्सीलेटर देताच,  त्यात पालकमंत्री मग मागे कसे राहतील. त्यांनीही खासदार धनंजय महाडीक यांच्या खांद्यावर हात ठेवत, मागील सिट बळकावली. आणि सारेच उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते चकीत झाले. आणि धनंजय महाडीक यांनी  पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेऊन पाेलिसांच्या भव्य क्रींडागणावर एक छानसा फेरफटका मारला. पण या फेरफटका मारण्याने अनेकांच्या डाेक्यात मात्र विविध विचारांचा, चर्चेंच्या उधानांचा फेरफटका सुरु झाला. आणि दिवसभर काेल्हापूर जसे महाडीक आणि पालकमंत्री यांच्या या फेरफटक्याचे फाेटाे व व्हीडीओ जसे जसे व्हायरल हाेऊ लागले.तसे नेटकरी देखिल

सध्याचे सुरू असलेले राजकारण हे तुम्हाला प्रतिष्ठेचे व सत्याचे वाटते का?

View Results

Loading ...

विविध टिप्पणी, प्रतिक्रीया साेशल मिडीयावर व्हायरल करू लागले., नेटकऱ्यांनी या फेरपटक्याचा स्वतःही व्हायरल करून आनंद लुटला. राजकारणात आजही कितीही राजकारणात घडामाेडी झाल्या तरी पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडीक यांचे आदरयुक्त नाते वेगळेचं आहे. आजही मुश्रीफ दिसले की, खासदार धनंजय महाडीक हे त्यांना आदराने नमस्कार करतात.  खासदार हाेण्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाटा माेठा आहे. आता तर दाेघेही सत्तेत,महायुती असल्याने खासदार धनंजय महाडीक यांना जिल्ह्यात आणखीच पाठबळ मिळाले असूून सध्या, खासदारांच्या कामांच्या गतीची व निधी वाटपाची बुलेट देखिल सुसाट सुरु आहे. 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.