कोल्हापूर विमानतळाच्या विकासाला नवी दिशा उडान – 2 योजनेत कोल्हापूरचा समावेश होणार – केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात महत्वपूर्ण चर्चा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कार्गो, वैमानिक प्रशिक्षण केंद्र, धावपट्टी विस्तारीकरणासह मुंबई विमानसेवेसाठी एअरबस बाबत सकारात्मक पावले

कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात पुणे येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर विमानतळावर हवाई मालवाहतूक सेवा सुरू करणे, वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारणे, धावपट्टीचे तीन हजार मीटरपर्यंत विस्तारीकरण तसेच कोल्हापूर-मुंबई विमानसेवा मोठ्या क्षमतेच्या विमानांद्वारे (एअरबस) सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.  विमानतळाच्या विकासाशी संबंधित तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याबाबत दोन्ही मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात कोल्हापूर विमानतळावर सुरक्षितता मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संबंधित विभागांची मान्यता घेण्यात येणार असून, त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची आवश्यक मान्यता मिळविण्यासाठी मंत्री आबिटकर यांच्या कार्यालयामार्फत पाठपुरावा केला जाणार आहे. या मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करता येणार आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर विमानतळाचा समावेश उडान -2 योजनेत करण्याबाबत यावेळी स्पष्ट संकेत देण्यात आले. यामुळे माफक दरात विमानसेवा उपलब्ध होणार आहे. कोल्हापूरच्या विमानसेवेच्या विस्तारीकरणांमध्ये हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्रासाठी विमानांच्या हालचालींचा मार्ग तसेच विमाने उभी करण्याचे क्षेत्र आणि विमान ठेवण्यासाठीचे दुरुस्तीगृह या कामांची स्वतंत्रपणे प्रक्रिया केली जाणार आहे. प्रशिक्षण केंद्राचे प्रस्तावित ठिकाण विमानतळाच्या तामगावच्या दिशेच्या बाजूस असल्याने तेथे स्वतंत्र सुरक्षा प्रवेश व्यवस्था उभारावी लागणार आहे. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नियोजन विभागाची मान्यता तसेच त्यानंतर नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे.

या स्वतंत्र प्रवेशद्वारासाठी क्ष-किरण तपासणी यंत्रासह सुरक्षा व्यवस्था उभारावी लागणार असून, त्यासाठी आवश्यक पोलीस मनुष्यबळ तैनात करण्याची कार्यवाही कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर करावी लागणार आहे. तामगावच्या बाजूला जाणारा रस्ता, वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी तामगावच्या बाजूने आवश्यक प्रवेशव्यवस्था निर्माण करण्यासाठी २५ गुंठे जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्तावही बैठकीत चर्चेत आला. सध्या हा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्यालयातील सदस्य स्तरावरील मान्यतेसाठी जमीन व्यवस्थापन विभागामार्फत सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याशिवाय कोल्हापूर विमानतळावर हवाई मालवाहतूक सेवा सुरू करण्याबाबतही मोहोळ आणि आबिटकर यांच्यात चर्चा झाली. कोल्हापूर, इचलकरंजी, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासह इतर उद्योग, द्राक्षे आणि आंबा यासह कृषी आणि प्रक्रिया उद्योगांना हवाई मालवाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाल्यास मालाची जलद वाहतूक शक्य होणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार आणि निर्यात क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर विमानतळाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन धावपट्टी विस्तारीकरणाचा विषयही बैठकीत पुढे आला. सध्याची सुमारे 1930 मीटरची धावपट्टी पहिल्या टप्प्यात 2300 मीटर आणि पुढील टप्प्यात 3000 मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक असलेल्या ६४ एकरपैकी बहुतांश भूसंपादन पूर्ण झाले आहे.

कोल्हापूर-मुंबई हवाई जोडणी अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या सेवेला अनुकूल सुविधा निर्माण करण्याबाबतही आबिटकर यांनी मोहोळ यांच्याशी चर्चा केली. यासाठी धावपट्टीची लांबी, विमानांच्या हालचालींसाठीचे मार्ग, विमाने उभी करण्याची जागा तसेच संबंधित विमानांच्या प्रकारानुसार आवश्यक तांत्रिक निकष पूर्ण करावे लागणार आहेत. संबंधित विमानप्रकारांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची आवश्यक मान्यता घेण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात येणार आहे.

मोहोळ-आबिटकर यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेमुळे कोल्हापूर विमानतळाच्या विकासातील विविध प्रलंबित बाबींना गती मिळण्याची अपेक्षा आहे. प्रवासी विमानसेवेबरोबरच हवाई मालवाहतूक, वैमानिक प्रशिक्षण, विमान देखभाल-दुरुस्ती आणि मोठ्या क्षमतेच्या विमानसेवांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 हवाई मालवाहतूक (कार्गो) सेवेमुळे उद्योगांना चालना

कोल्हापूर विमानतळावर हवाई मालवाहतूक सेवा सुरू झाल्यास कोल्हापूर, इचलकरंजी, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. औद्योगिक उत्पादने, निर्यातक्षम माल, तातडीची मालवाहतूक तसेच कृषी व प्रक्रिया उद्योगातील उत्पादनांची जलद वाहतूक शक्य होईल. त्यामुळे कोल्हापूर विमानतळाच्या माध्यमातून उद्योग आणि व्यापाराच्या विस्ताराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

 कोल्हापूर-मुंबई एअरबस सेवेसाठी प्रयत्न

कोल्हापूर-मुंबई हवाई सेवा अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या सेवेला अनुकूल पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विषय बैठकीत मांडण्यात आला. त्यासाठी धावपट्टीची लांबी, विमानांच्या हालचालींसाठीचे मार्ग, विमान उभे करण्याची जागा आणि विमानांच्या प्रकारानुसार आवश्यक तांत्रिक निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. संबंधित विमानप्रकारांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची आवश्यक मान्यता घेण्याची प्रक्रियाही पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे कोल्हापूर विमानतळाचा विकास प्रवासी वाहतुकीसोबतच हवाई मालवाहतूक, वैमानिक प्रशिक्षण, विमान देखभाल-दुरुस्ती आणि मोठ्या क्षमतेच्या विमानसेवांसाठी सक्षम करण्याच्या दिशेने होणार आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.