* अपहरण आणि पोक्सो प्रकरणात आरोपीला जामीन
*पीडितेचा जामीन अर्जास विरोध तरीही आरोपीचे वकिल ॲड भारत सोनुले युक्तीवादाने जामीन मंजूर*
कागल TEAM WATCH : कागल पोलिस ठाणे येथे अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून दि ३ सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहिता १३७(२), ७६,७८, ३५१(२), ३५२ आणि पोक्सो ८ व १२ Stomach युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात फिर्यादीने पीडित मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अपहरण केले होते आणि पीडित मुलीचा ३ वर्षापासून जबरदस्ती पाठलाग करून तिचा छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी संशयित आरोपीचे वतीने ॲड भारत सोनुले यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. शनिवारी दि ६ ऑक्टोबर रोजी विशेष न्यायाधीश कोल्हापूर यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाने आरोपीला जामीन झाल्यास पुन्हा फिर्यादीला आणि पीडितेला त्रास देऊ शकतो , आरोपी व पीडित एकच भागात राहत असल्याने पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता आहे , फिर्यादीने व पीडितीने मे कोर्टात जामीन देण्यात येऊ नये अशी लेखी हरकत घेतली होती. आरोपीने ३ वर्षापासून पीडितेच्या स्थितीचा गैरफायदा घेतला असल्यानेच व सदर प्रकरणाचा अद्याप तपास अपूर्ण असल्याने जामीन देण्यात येऊ जोरदार हरकत घेत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात असा युक्तिवाद केला होता.
*आरोपीचे वकिलांचा मुद्देसूद युक्तिवाद…!*
संशयित आरोपीचे वकील भारत सोनुले यांनी फिर्यादीने गुन्हा दाखल करण्यास ३ दिवसांचा उशीर केला आहे व त्याची कारणे तक्रारीत नमूद नाहीत, आरोपी व पीडित ह्यांचे प्रेमसंबध असल्याने केवळ त्याला विरोध म्हणून पीडितेच्या कुटुंबियांनी हा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. तसेच पीडित मुलगी ही कुटुंबियांच्या दबावात येऊन आरोपीविरुद्ध भूमिका मांडत आहे असे में. कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपी विरुद्ध पूर्वीचा कोणताही गुन्हा दाखल नाही पोक्सो कायद्याचा उद्देश्य प्रेमसंबधला विरोध म्हणून अमलात आणला गेला नाही तर अल्पवयीन मुलांच्या सुरक्षितेसाठी आहे. सदर प्रकरण हे द्वेष भावनेने दाखल केले असल्याचे युक्तिवाद केला. आरोपीकडून कोणतीही जप्ती शिल्लक नाही. सदर प्रकारच्या तक्रारी या कायद्याचा दुरुपयोग असून आरोपीला जामीन द्यावा असा युक्तिवाद केला.
संशयित आरोपीचे वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आज दि ०६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने अटी आणि शर्ती सह आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. सदर कामी ॲड भारत सोनुले यांना सहायक म्हणून ॲड सरोज देसाई , ॲड प्रिती देवर्डेकर, ॲड आकाश साठे , ॲड स्नेहलता यादव , ॲड स्वालेहा नालबंद यांनी काम पाहिले.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.










































































