नागाव :प्रतिनिधी /रुपेश आठवले
नागाव तालुका हातकलंगले येथे ऍग्रो स्टॅक फार्मर कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागाव तालुका हातकणंगले येथे ऍग्रो स्टॅक फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत नागाव व तलाठी ऑफिस मार्फत गावातील सीएससी केंद्र चालक व गावातील रेशन दुकानदार यांची मीटिंग घेऊन गावात कॅम्पची नियोजन केले. हा कॅम्प ग्रामपंचायत व नागाव विकास सोसायटी येथे यशस्वी झला.या कॅम्पला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला सर्व डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांची थोडी गैरसोय झाली. परंतु हळूहळू लोकांचे फार्मर आयडी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली. शेतकऱ्यांनी थांबून या योजनेचा लाभ घेतला.
या कॅम्प साठी नागाव गावचे तलाठी सिकंदर पेंढारी,ग्रामसेवक विठ्ठल कांबळे ,अनिल शिंदे ,कोतवाल अस्लम मुलाणी ,धान्य दुकानदार अमित गुरव किरण मिठारी ,अभिनंदन लंबे ,अजिंक्य यादव, तसेच सीएससी सेंटरचे अमोल घेवारी, प्रकाश कांबळे, प्रशांत कुंभार स्वरांजली आठवले ,शिरगुप्पे मॅडम ,आदी मान्यवर उपस्थित होते तलाठी साहेबांनी रेशन दुकानदार व सीएससी धारकांना या शेतकरी नोंदणी जास्तीत जास्त करावी असे आवाहन केले.