नागाव :रुपेश आठवले
*राजू मामा सोशल फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिराला प्रतिसाद
नागाव तालुका हातकलंगले येथे कै. राजेंद्र नागू यादव उपसरपंच नागाव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा दिनानिमित्त *राजूमामा सोशल फाउंडेशन* तर्फे आरोग्य शिबिराला उत्सु्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम गावातील खणाईदेवी मंदिर परिसरातील हॉलमध्ये घेण्यात आला. त्या कार्यक्रमांमध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. या शिबिरामध्ये 400 जणांनी लाभ घेतला.
सर्वप्रथम राजू मामाच्या फोटो पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
“राजू मामा सोशल फाउंडेशन” हे सामान्य गरीब युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या सेवेसाठी कायम तत्पर कार्यरत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, पुरंदर पाटील मामा यांनी शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, संजय वडार , भरत पाटील, सुनील कांबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सतीश लंबे ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन साळुंकुरे, अजित घाटगे, विजय पाटील, भीमराव खाडे, माजी सरपंच अरुण माळी व गावातील सेवा सोसायटी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
तसेच या शिबिरासाठी अजिंक्य यादव, सागर शिंदे, भाऊ घाटगे, रुपेश आठवले, सहील मिनेकर, ऋतिक मिणेकर यांनी योगदान केले.