जिल्ह्यातील मागासवर्गीयांच्या प्रश्नासाठी पालकमंत्री आबिटकर यांचे बरोबर प्रा. शहाजी कांबळे यांची सविस्तर चर्चा…
——————————————–
गारगोटी – भीमा कोरेगाव आंदोलनामधील 1850 बेकसुर भीमसैनिकावरील खोटे गुन्हे मागे घेण्यासह अनेक प्रश्न वर आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांचे बरोबर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे संघटन सचिव यांनी विस्ताराने चर्चा केली. गारगोटी येथील त्यांच्या निवासस्थाने ही चर्चा संपन्न झाली या चर्चेमध्ये पुढील प्रश्नावर व्यापक चर्चा झाली.
3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंद वेळी कोल्हापूर येथे आंबेडकरवादी अनुयायी भीमसैनिक आणि विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला होता, या बंद वेळी काही जातीयवादी समाजकंटकाने आंदोलकांच्या वर हल्ला केला यावेळी आंदोलकावरच खोटे गुन्हे दाखल केले आणि दरोडे सारखे कलमे लावून आंदोलकांना बदनाम केले. चळवळ बदनाम करण्याचे एक मोठं षडयंत्र तत्कालीन व्यवस्थेने यशस्वी केले आणि या आंदोलकांना 2018 पासून जखडून टाकले. म्हणून आज जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आंबेडकर यांना विविध प्रश्नांच्या संदर्भात दलितांच्या रखडलेल्या विकास कामाबाबत तसेच उपेक्षित शोषित कामगार यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिकेकडील परिवहन विभागाचे कर्मचारी गेले अनेक दिवस सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांची पदोन्नती अनुकंपावरील नोकर भरती यासारख्या अनेक प्रश्नांसाठी संघर्ष करत आहेत मंत्री झाल्यानंतर कर्मचारी संघटनेने नामदार आंबेडकर यांच्या मध्यस्थीनंतर 26 जानेवारी रोजी होणारे बेमुदत आमरण उपोषण मागे घेतले आहे त्यामुळे केएमटीकडील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आंबेडकर यांनी घेतलेली आहे त्या संदर्भात लेखी आदेश महानगरपालिका आयुक्त आणि परिवहन विभागाला दिलेले आहेत शासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले..
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारातील 40 वर्षाहून अधिक काळ रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात सेवा देऊन सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या खोके धारकांच्यावर बेकायदेशीर रित्या सीपीआर प्रशासन चुकीची कारवाई केली आहे. न्यायालयात या प्रश्न सुनावणी चालू असताना चुकीचा अर्थ लावून जबरदस्तीने संविधानाला लोकशाहीला न्यायालयाला काळी माप असेल असे कृत्य सीपीआर प्रशासनाने केलेले आहे. यामध्ये गेले 40 वर्ष सेवा देणाऱ्या या चौकीदारावर धारकांच्यावर मोठा अन्याय केलेला आहे या संदर्भात पालकमंत्री यांच्या निदर्शनास ही कारवाई आणून दिलेली आहे वाहतुकीला अडथळा होतो. असे घासून केलेली कारवाई झाल्यानंतर सुद्धा या परिसरातली वाहतूक व्यवस्था रुग्णसेवा डॉक्टर यांची उणीव कर्मचाऱ्यांची वाणवा औषधांची कमतरता सेवांमध्ये रक्त लघवी तपासणारे यंत्र सुद्धा चालू नाही. अनेक मशीन बंद आहेत. अशावेळी केवळ भौतिक यंत्रणा दाखवून सीपीआरची सुधारणा दाखवली जात आहे. प्रत्यक्षात रुग्णसेवा आणि रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या सवलती सोयी सुविधा यांच्याकडे सीपीआर प्रश्नाचे बिलकुल लक्ष नाही.. इथल्या अव्यवस्थेचे अनेक उदाहरण असताना सुद्धा केवळ अतिक्रमणाचे भांडवल केले जात आहे. इथली अतिशय काढत आहे.त्यामुळे या 40 वर्ष वर्षे जगणाऱ्या अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन ही अत्यंत गरजेची बाब आहे.
याकरिता पालकमंत्र्यांनी लवकरच योग्य ती कारवाई करून न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली जसे की बिंदू चौक येथील आंदोलकावरील गुन्हे मागे घेणे शाहूपुरी येथील शाहू भीम स्मारक पूर्ण करणे माणगाव तालुका हातकणंगले येथील ऐतिहासिक नानगाव परिषदेचे तातडीने शासनाने पूर्ण करणे याशिवाय मसाई पठार सारखे धम्म विषयक प्रश्न आणि शास्त्रीनगर येथील बुद्ध गार्डन विकासाचा प्रश्न यावेळी चर्चा करण्यात आला यावेळी सुरेश कांबळे सोन्याची शिरोली दिलीप कांबळे कोथळी अमर कांबळे, पन्हाळा दयानंद कांबळे, मिनचे रुपेश आठवले, नागाव नागाव शांताराम कांबळे, राधानगरी विलास कांबळे पार्ट पन्हाळा, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्राचार्य अर्जुन अबिटकर यानी सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देऊ असे सांगितले.