WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

प्रकाश आबिटकर 28 रोजी उमेदवारी दाखल करणार – दत्तात्रय उगले

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

गारगोटी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठक- दत्तात्रय उगले, उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते

गारगोटी – राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर हे सोमवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून भुदरगड तालुक्यातील जास्तीत-जास्त महिला, युवक व नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन राहूरी कृ‍षि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले यांनी केले. ते गारगोटी (ता.भुदरगड) येथे भुदरगड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना उगले म्हणाले की, आमदार प्रकाश आबिटकर यांनी मागील 10 वर्षामध्ये मतदार संघातील सर्वसामान्य माणसाला आपला केंद्रबिंदू मानून काम केले आहे. त्यांनी केलेल्या विकास कामांमध्ये मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. त्यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी संख्येने उपस्थित रहा असे म्हणाले.

यावेळी बोलताना बाबा नांदेकर म्हणाले की, आमदार प्रकाश आबिटकर यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघात खेचून आणला आहे. आजपर्यंत मतदार संघाचा जेवढा विकास झाला तो आज तागायत कोणत्याही आमदरांनी केला नव्हता. त्यांनी केलेल्या कामाच पोहच पावती म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पहिल्या यादीमध्येच त्यांची उमेदवारी घोषित केली आहे. येत्या 28 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा उमेदवारी अर्ज भरुया असे ते म्हणाले.

अर्ज भरण्याचा मार्ग दहा वाजता गारगोटी शहरातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक गारगोटी-मुदाळ तिट्टा–शेळेवाडी–भोगावती कारखाना– घोटवडे-कौलव-बरगेवाडी-सिरसे-आमजाई व्हरवडे-आवळी बुद्रुक-आणाजे-खिंडी व्हरवडे-गुडाळ-गुडाळवाडी-कसबा तारळे-पिरळ करत राधानगरी शहरामध्ये जाऊन थांबणार आहे. या ठिकाणी जाहीर सभा होऊन दुपारी 3 वाजता प्रकाश आबिटकर येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आबिटकर हे या मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, संदीप वरंडेकर, सुर्याजी देसाई, मदन देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत, अशोकराव भांदीगरे, बाळासाहेब भोपळे, विक्रम पाटील, मानसिंग पाटील, सर्जेराव देसाई, अंकुश चव्हाण, प्रविण नलवडे, युवासेना प्रमुख विद्याधर परीट, राजाराम भराडे, रामभाऊ शिऊडकर यांच्यासह प्रमुख मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.