WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTION के.पी.पाटील यांचा 10 वर्षाचा आमदारकीचा कालावधी लोकांनी पाहिलाय – अरुणकुमार डोंगळे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

माजी आमदार के. पी. पाटील यांच्यामुळे मतदार संघ 10 वर्षे पाठीमागे गेला…

अर्जुनवाडा – आमदारकीच्या 10 वर्षाच्या कालावधीत माजी आमदार के.पी.पाटील राधानगरी मतदार संघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदार संघ 10 वर्ष पाठीमागे गेला. याउलट आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने केलं आहे. त्यामुळे या निवडणूकीत आमदार प्रकाश आबिटकर यांचा विजय निश्चित असून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी व्यक्त केला. ते तुरंबे (ता.राधानगरी) येथे महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

डोंगळे म्हणाले की, माजी आमदार के.पी.पाटील यांचा 10 वर्षाचा आमदारकीचा कालावधी लोकांनी पाहिलेला आहे. या कालावधीत ते मतदार संघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदार संघ 10 वर्षे पाठीमागे गेला आहे. निवडणूकीत कोणत्याही आमीशाला बळी पडू नका. मतदार संघाचा विकास करणाऱ्या माणसाला साथ देऊया. निवडणूकीत उच्चांकी मतांनी आमदार आबिटकर निवडून देऊन मतदार संघाचे अपुर्ण राहिलेले मंत्री पदाचे स्वप्न साकार करूया यामध्ये राधानगरीकरांचा मोठा वाटा असेल अशी ग्वाही दिली.

जालिंदर पाटील म्हणाले की, आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे जाधव गुरूजी काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसरे गुरूजी आपल्या सोबत आलेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मी आणि माझा मुलगा या राजकारणाला विरोध करण्याचे सामर्थ्य आमदार आबिटकर यांनी दाखविलेले आहे. प्रस्थापितांनी उभे केलेले चक्रव्युव्ह भेदून आमदार प्रकाश आबिटकर मोठ्या मताधिक्यानी विजयी करून राधानगरीची जनता पुन्हा वाजत-गाजत विधानसभेत पाठविणार असल्याचे सांगितले.

आजरा जि. प. मतदार संघातून मताधिक्य देणार – अशोकआण्णा चराटी
मंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार प्रकाश आबिटकरांच्या प्रयत्नामुळे आजरा शहराला नगरपंचायत मंजूर झाली. आजरा शहराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याचबरोबर आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. एकीकडे मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे आमदार आबिटकर तर याउलट दुसरीकडे माजी आमदार के.पी.पाटील मतदार संघात फिरकतच नव्हते असे चित्र होते. त्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील जनता आमदार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राधानगरीतील विविध संघटनांचा पाठींबा…
राधानगरी तालुका गवई गटाचे उपाध्यक्ष सातापा कांबळे, तालुका संघटक रविंद्र कांबळे, जिल्हा संघटक विलास कांबळे, विश्वास कांबळे-दुर्गमानवाड, यशवंत कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सरवडे येथील अरुण साठे गटाने जाहीर पाठींबा दिला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.