कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य करतो. कर्नाटकमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतो, हा इतिहास आहे. तीच परंपरा याही निवडणुकीत मतदारांनी कायम ठेवली. तरीही मतदारांच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. विशेष म्हणजे कर्नाटक मधील निवडणूकीत भाजपची मतदानाची टक्केवारी कमी झालेली नाही. जनता दलाच्या मतांच्या टक्केवारीत ५ ते ७ टक्क्यांनी घट झाली आणि ती मते कॉंग्रेसला मिळाल्याने, त्यांचा विजय सुकर झाला. मात्र यापुढंही कर्नाटकच्या विकासासाठी भाजप तितक्याचं जोमाने कार्यरत राहील. सत्ताधार्यांवर प्रभावी अंकुश ठेवण्याचे काम करेल आणि येणार्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरून जनाधार मिळवून दाखवेल.
आपला, धनंजय भिमराव महाडिक, खासदार, राज्यसभा |