छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी…
कोल्हापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अबूतपूर्व यश मिळाला असून भाजपचा धुवा उडालाय. या पार्श्वभूमीवर देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने या विजयाचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे कोल्हापुरात काँग्रेस कमिटी कडून कर्नाटकातील विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशां चा गजर फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि साखर पेढे वाटून विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस विजयाच्या जोरदार घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला. यावेळी आमदार सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून हलगीवर ठेका धरला.