सामाजिक न्याय पर्व अंतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

ऐतिहासिक बिंदू चौक येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

कोल्हापूर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती ‍निमित्त सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने दसरा चौक येथून अभिवादन रॅली काढण्यात आली. या अभिवादन रॅलीस महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी तसेच समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे आणि‍ आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन रॅली छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दसरा चौक ते बिंदू चौक मार्गाने अभिवादन रॅली घेण्यात आली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

ऐतिहासिक बिंदू चौक येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. प्रकाश नाईक व प्रा. शरद गायकवाड यांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यानंतर कुणाल कांबळे व सहकारी यांनी त्यांच्या गीतामधून महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याला उजाळा देत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर गीतामधून मांडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी मांडले. कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच समाज कल्याण कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.