शिराळा (जी.जी.पाटील)
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बेरडेवाडी येथील कमी पटाच्या शाळेने समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले… पट नऊ गुणवत्ता यादीत सात, प्रतिकूल परिस्थितीवर केली गुणवत्तेने मात.
शिराळा तालुक्यातील डोंगर कपारीतील इ लर्निंग सारखे अभिनव उपक्रम व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या शाळेतील मुख्याध्यापक सुप्रिया घोरपडे व उपशिक्षक जितेंद्र लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जागरूक पालक यांच्या सहकार्यातून हे नेत्रदीपक यश संपादन झाले. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी कुमार सार्थक आनंदा कंदारे याने समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत 100 पैकी 100 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला तसेच इयत्ता पहिली प्रबुद्ध जितेंद्र लोकरे(100/ 92, )पूर्वा एकनाथ बेरडे (100/90) यांनी पहिलीत अनुक्रमे केंद्रात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरी ओंकार दत्तात्रय बेरडे 100/90 याने केंद्रात तृतीय क्रमांक तसेच इयत्ता तिसरीतील विद्यार्थी वेदांत लक्ष्मण कंदारे 200/180 केंद्रात प्रथम , अथर्व तुकाराम धामणकर (200/ 170)केंद्रात तृतीय व इयत्ता चौथीचा करण भाऊ बेरडे (200/178) याने केंद्रात तृतीय क्रमांक पटकावला . यशवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुप्रिया घोरपडे व उपशिक्षक जितेंद्र लोकरे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे , शिक्षणविस्ताराधिकारी अशोक महिंद ,गटशिक्षणाधिकारी अरविंद माने यांचे मार्गदर्शन लाभले. |