WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

मध, रेशीम, शेळीपालन, साठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी राज्यात आदर्श निर्माण करावा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Loading poll ...
Coming Soon
येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल?
{{ row.Answer_Title }} {{row.tsp_result_percent}} % {{row.Answer_Votes}} {{row.Answer_Votes}} ( {{row.tsp_result_percent}} % ) {{ tsp_result_no }}

नाबार्डच्या पुढाकाराने जिल्ह्यात तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना

कोल्हापूर : नाबार्डच्या पुढाकाराने भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे मध उद्योगासाठी, चंदगड तालुक्यातील बसरगे येथे रेशीम उद्योगासाठी तसेच हातकणंगले तालुक्यात शेळीपालन यासाठी जिल्ह्यात तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येत आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून तीनही उद्योग व्यवसायाला चालना मिळून या कंपन्यांनी उत्कृष्ट काम करुन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

नाबार्डच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली मध, रेशीम, शेळीपालनासाठीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, राज्य रेशीम समन्वय समितीचे सदस्य अधिकराव जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कृषी विभागाचे उपसंचालक रवींद्र पाठक, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.एम.कांबळे, पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी, संदीप कुमार तसेच शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी व संबंधित लाभार्थी, शेतकरी उपस्थित होते. यावेळी नाबार्डच्या वतीने कंपन्यांना मान्यता मिळाल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, मधमाशी पालन, रेशीम शेती, शेळीपालन आदी शेतीपूरक व्यवसाय हे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्वपूर्ण आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा व पर्यायाने जिल्ह्याचा विकास साधला जाईल. तथापि, या तीनही कंपन्यांतील उत्पादनांचा दर्जा चांगल्यात चांगला राखला जाईल, यासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घ्यावी. जेणेकरुन या उत्पादनांना विविध भागांतून मागणी वाढेल, उत्पादने सर्वदूर पोहोचतील व उत्तम दर मिळेल.

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीची कागदपत्रे लवकरात लवकर जमा करुन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करा. या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार सुरुवातीपासूनच सुरळीत राहण्यासाठी चोख हिशोब ठेवा. व्यवसाय वृद्धीसाठी ‘बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन’ तयार करुन नाबार्डच्या योजनांचा लाभ घ्या. या कंपन्यांच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांचा दर्जा सुधारणे, बाजारपेठ व बाजारभाव मिळवून देण्यासाठी,तसेच मालाचे पॅकेजिंग, लेबलिंग व ब्रँडिंगबाबत आवश्यक ते प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन आणि शासनाच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले.

रेशीम शेती, मध उद्योग आणि शेळीपालन उद्योगाद्वारे रोजगार निर्मिती आणि लाभार्थ्यांची क्षमता वृद्धी व कौशल्य विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन ती चालवण्यासाठी नाबार्डच्या वतीने तिन्ही कंपन्यांसाठी साधारण 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानातून कंपन्यांची नोंदणी, देखभाल तसेच कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाच्या क्षमता वृध्दीसाठी प्रशिक्षणे, अभ्यास दौरे आयोजित करणे तसेच अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त उत्पादनांच्या ब्रँडिंग व मार्केटिंगसाठीही मदत केली जाणार आहे, अशी माहिती नाबार्डचे सहायक महाप्रबंधक आशुतोष जाधव यांनी दिली.

संदेश जोशी यांनी पाटगाव येथील मध उद्योगाबाबत सादरीकरणातून माहिती दिली. या तीनही शेती उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी क्रेडाईच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाहूपुरी येथे वर्षभरासाठी मोफत दुकानगाळा देण्यात येईल, असे क्रेडाईचे आदित्य बेडेकर यांनी सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.