खारवडे मुळशी येथील ग्रामदैवत म्हसोबा मंदिर परिसरातील उपक्रमांचे विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हस्ते हनुमान जयंती निमित्त अनावरण
पुणे : मुळशी तालुक्यातील खारवडे येथील म्हसोबा मंदिराचे नव्याने केलेल्या कामाचे, मंदिर वेबसाईट आणि मंदिराच्या वर्णनपर गीताचे अनावरण आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. म्हसोबा यात्रेच्या निमित्ताने आज डॉ. गोऱ्हे येथे या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. हनुमान जयंती उत्सवाच्या आज त्यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी म्हसोबा देवस्थानचे प्रलंबित प्रश्न सोडविताना आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले जाईल, असे सांगितले. यावेळी केलेल्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत मधुरा भेलके यांनी केले. मानव्य संस्थेच्या एच आय व्ही बाधित मुलासंठीच्या कार्याबद्दल देवस्थानच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिरीष लवाटे यांना सपत्नीक “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
यावेळी कोथरूड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, पदाधिकारी विलास सोनवणे, मंदिर देवस्थानाच्या विश्वस्त मधुरा भेलके, शंकर मांडेकर, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंहभारती, गुरुवर्य भाऊ महाराज परांडे, मानव्य संस्थेचे शिरीष लवाटे आदी उपस्थित होते. हनुमान जयंती उत्सवानिमित्त म्हसोबा देवस्थानची आरती आज त्यांच्या हस्ते करण्यात आली.