नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली मंजुरी…
20 एप्रिल पासून मुंबई – कोल्हापूर नाईट लँडिंग विमान सुविधा सुरू होणार ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मंजुरी दिली आहे.कोल्हापूर विमानतळावरून 20 एप्रिल पासून विमानांचे नाईट लँडिंग करण्यात येणार आहे. यासाठी 75 असनी विमानसेवा उपलब्ध असणार आहे. यामुळे आता कोल्हापुरातून रात्री विमान सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डीजीसीएच्या या निर्णयामुळे कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण वेगाने सुरु आहे. धावपट्टी, टर्मिनस इमारत, एटीसी टॉवर,पार्किंगची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. विमानतळावर नाईट लँडिंग सुरू झाल्यावर धुके आणि प्रचंड पाऊस यामुळे विमानसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. लवकरच या विमानतळावर डीव्हीओ आर प्रणाली बसवण्यात येणार आहे.