निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. सतीश पावसकर, के. एम. पाटील, अक्षय खामकर व प्राध्यापक वर्ग
तळसंदे – तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या 132 विद्यार्थ्यांची विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळाले आहे.
महाविद्यायाद्वारे घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये जे एन के, मुंबई कंपनीमध्ये मेकॅनिकल विभागाच्या अर्जुन जाधव, शुभम पाटील या दोघांची ४ लाख प्रतीवर्ष पॅकेज वरती निवड करण्यात आली. एसकेएचएम या कंपनीत ४, बजाज ऑटोमध्ये ५, टी ई कनेकटीव्हिटी या कंपनीत ९२ विद्यार्थ्यांचे, तसेच विडजेन इंडिया या कंपनीमध्ये २६ विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांना सरासरी दोन ते अडीच लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.
टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर म्हणाले, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि महाविद्यालयाकडून देण्यात येत असलेल्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे हे यश मिळाले आहे. यापुढेही अधिकाधिक विद्यार्थ्यांना चांगली प्लेसमेट मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर तसेच सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.























































