विनायक जितकर
डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचा उपक्रम, हॉटेल सयाजी येथे सुविधा
किडसलँडचा फीत कापून शुभारंभ करताना डॉ संजय डी पाटील, सौ वैजयंती पाटील. समवेत आमदार ऋतुराज पाटील, सौ. पूजा पाटील, पृथ्वीराज पाटील सौ. वृषाली पाटील, आर्यमन पाटील.
कसबा बावडा – लहान मुलांसाठी रोमांचकारी अनुभव देणारा आणि सर्वात मोठा सॉफ्ट प्ले एरिया असलेल्या ‘किड्सलँड’चा डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील, आमदार ऋतुराज पाटील, सौ. पूजा पाटील, पृथ्वीराज पाटील सौ. वृषाली पाटील, आर्यमन पाटील आदी उपस्थित होते.
बच्चे कंपनीची गरज ओळखून त्यांना खेळ, ज्ञान व मनोरंजनाचा खजाना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने हॉटेल सयाजी येथे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. |
सौ. पूजा ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून तब्बल साडेतीन हजार चौरस फुट जागेवर सुरु करण्यात आलेले ‘किड्सलँड’ हे मुलांसाठीची अनोखी दुनिया ठरणार आहे. ‘किड्सलँड’च्या शुभारंभानिमित्त ग्रुप बुकिंगसाठी (किमान १० लोकांसाठी) अतिरिक्त १० टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे.
इन्डोअर प्लेग्राउंड, ट्रॅम्पोलीन पार्क, टॉडलर प्ले एरिया त्याचबरोबर मुलांसाठी विशेष कॅफेची सुविधा याठिकाणी उपलब्ध आहे. छोट्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी मुलांसाठी शुद्ध शाकाहारी पदार्थ उपलब्ध असून त्यासाठी स्वतंत्र किचन व प्रशिक्षित स्टाफ तैनात आहे. मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी अत्यंत प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मुले, मुली व अपंग यांच्यासाठी स्वतंत्र वॉश रूम, डायपर बदलण्यासाठीचा विभाग, बास्केट बॉल, ४ लेन स्लाईड, बॉल पूल, हर्डल्स, एअर शुटींग गन, वॉल क्लाइंबिंग, स्पेस शटल, मॅजिक टनल, रीव्हॉल्विंग ऑबस्टॅकल्स, हँगिंग बॉल ऑबस्टॅकल्स, बॉक्सिंग बॅग ऑबस्टॅकल्स, चॅलेंज ब्रिज असे विविध खेळांचा मनमुराद आनंद मुलांना घेता येणार आहे.
नोकरी-व्यवसाय करणाऱ्या जोडप्यांना अनेकदा डी. वाय. पी. सिटी मॉलमध्ये खरेदी वा अन्य कारणासाठी बाहेर जाताना आपल्या मुलांना कोठे ठेवायचे असा प्रश्न पडतो. अशा लोकांसाठी त्याचबरोबर आपल्या मुलांच्या हटके करमणुकीसाठी किड्सलँड हा उत्तम पर्याय ठरणार आहे. याठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी येथील कर्मचाऱ्याकडून घेतली जाणार आहे.
१ ते ९ वर्षे वयाच्या मुलांसाठी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत ‘किड्सलँड’ची सेवा उपलब्ध असेल. ‘किड्सलँड’मध्ये सर्व मुलांसाठी सॉक्स व ३ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी डायपर वापरणे बंधनकारक आहे. पालकांनी आपल्या मुलांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘किड्सलँड’ची सफर घडवावी असे आवाहन सौ. पूजा ऋतुराज पाटील यांनी केले आहे.