CRIME_माेहिम फत्ते… LCB ने पकडले टाेळीला, कसे ते वाचा सविस्तर

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375
कोल्हापूर: येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विधानसभा निवडणुकीच्या काळात तोतया भामटे अधिकारी बनून केलेली चोरी मोठ्या शिताफीने उघडकीस आणून संबंधित फिर्यादीला न्याय मिळवून दिला आहे. यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोल्हापूर येथील तावडे हॉटेल येथे एका व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्ह्या शाखेने अटक करून त्यांच्याकडून 25 लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेल्या तीस लाख रुपये किमतीच्या दोन गाड्यासह एकूण 55 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक १२ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजता तावडे हॉटेल येथे हायवे ब्रिजवर व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हरणे (रा. बागल चौक-कोल्हापूर) यांना पाच लोकांच्या टोळीने निवडणूक दक्षता (व्हिजीलन्स) अधिकारी भासवून  आचारसंहिता सुरू आहे. आपण इतकी मोठी रक्कम जवळ ठेवू शकत नाही ,असे सांगून फिर्यादी सुभाष लक्ष्मण हरणे यांना गाडीमध्ये बसवून शहरातील सरनोबतवाडी (ता.करवीर) येथील मार्गावर नेले. त्यानंतर त्यांना अधिकारी आहे, असे भासवून  त्यांच्याकडील 25 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हँडसेट काढून घेतला. व त्यानंतर हे भामटे अधिकारी तेथून कर्नाटक दिशेने फरार झाले. यासंबंधी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये सुभाष लक्ष्मण हरणे यांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या प्रकारामुळे पाेलीस यंत्रणा देखिल चक्रावून गेली.
या प्रकारानंतर संपूर्ण कोल्हापूर शहरात खळबळ माजली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना असा प्रकार घडल्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते. या घडल्या प्रकारानंतर याची गंभीर दखल घेताना जिल्हाधिकारी अमाेल येडगे आणि पाेलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तात्काळ गांधीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी देखील हे आव्हान स्वीकारत अवघ्या काही तासातच हा गुन्हा उघडकीस आणला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषनचे   पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन पोलीस अधिकारी २० अंमलदार आणि  ७ पथके नेमून या टोळीचा पर्दा फाश करण्यात यश मिळविले. 
पाेलिसांनी नियोजनबद्ध कट करून संबधित गुन्हेगारांना सापळा रचला या तोडीने व्यवसायिकास कशाप्रकारे लुटले याचे धाेगेदाेरे शोध घेत तपास पूर्ण केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरणगी व त्याचे साथीदार यांनी हा गुन्हा केला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. घटना घडल्यानंतर संबंधित सर्व आरोपी हे गोवा येथे गेले असल्याचे पक्की माहिती   समजल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांचे पथक तत्काळ गोवा येथे रवाना झाले. यावेळी त्यांना गोवा  ते सर्वजण  संशयित आराेपी कोल्हापूरच्या दिशेने असल्याचे समजले. पथकाने तातडीने  वेगान चक्र फिरवीत, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी ते कोल्हापूर मार्गावर पाेईखडे  येथे साफळा रचला आणि या सर्व आरोपींना अलगद ताब्यात घेतले. 
यामध्ये संजय महावीर किरणगे (वय ४२ )अभिषेक शशिकांत लघारे(वय २४) विजय तुकाराम खांडेकर (वय २८)  सर्वजण राहणार कोल्हापूर यांना व त्यांच्यासोबत असलेली टाटा हॅरिअर व निसान  कार ताब्यात घेतली आहे. या गुन्ह्यांमध्ये आणखी दोन आरोपी आहेत.  त्यांची नावे स्वप्निल रूप्पल लाला उर्फ  तानाजी जाधव व हर्षद खरात अशी त्यांची नावे आहेत.  ते सध्या फरारी आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे  पुढील तपास सुरू आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी की हर्षद खरात व स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव यांना व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हरणे यांच्याकडे मोठी रक्कम आहे व हे व्यावसायिक कर्नाटक येथून परत कोल्हापूर येथे येत आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर या सर्व आरोपींनी मिळून हरणे यांना लुटायचा प्लॅन पक्का केला आणि १२ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता तावडे हॉटेल जवळ ही लुटण्याची संपूर्ण प्रकार घडला हाेता. 

तसेच हर्षद खरात व स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव यांना सदर व्यावसायिक हा कर्नाटक येथुन परत कोल्हापूर येथे रक्कम घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा कट रचल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या ३ आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली २५ लाख रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेल्या टाटा हॅरियर गाडी क्र. KA-३३-Z-५५५० किंमत २० लाख रुपये व निसान मॅग्नेट गाडी क्र. MH-०९-GA-६२५९ किंमत १० लाख रुपये असा एकूण ५५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. २ आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल गांधीनगर पोलीस ठाण्यास जमा केला असून गुन्ह्याचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव करीत आहेत.

 ही कामगिरी पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके ,पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदीप पाटील ,महेंद्र कोरवी ,प्रवीण पाटील ,संतोष बर्गे, परशुराम गुजरे ,योगेश गोसावी ,विशाल खराडे, कृष्णा पिंगळे ,शुभम सकपाळ ,सागर माने, लखन पाटील अमित मर्दानी, अमित सर्जे, अमर वासुदेव, हिंदुराव केसरे, दीपक घोरपडे, प्रशांत कांबळे, संजय हुंबे ,महेश खोत, महेश पाटील, सुरेश पाटील, समीर कांबळे, संजय कुंभार, चालक सुशील पाटील व यशवंत कुंभार यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. स्थानिक गुन्हेंशन शाखेने केलेल्या कामगिरीचे पोलीस वर्तुळात व कोल्हापूर शहरांमध्ये अभिनंदन होत आहे.
या संपूर्ण तपासानंतर ज्यांचे पैसै लुटले गेले हाेते. फिर्याद देणारे स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पाेलीस निरीक्षक रविंद्र कांबळे तसेच पथकाचा यथाेचित सत्कार करण्यात आला आहे. पाेलिसांनी केलेली ही यशस्वी कामगिरी निश्चितच अभिनंदनीय तसेच कौतुकास पात्र आहे असे सांगितले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...