CRIME: शाहूपुरीत सापडला गांजा, मुद्देमाल जप्त

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375


शाहूपुरी गांजा कारवाई
कोल्हापूर: शाहूपुरी पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना ताब्यात घेतलय. परशुराम बिरांजे ओंमकार सारवान आणि दिलदार कांबळे अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 28 हजार रुपये किमतीचा गांजा, दोन मोपेड आणि मोबाईल असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना अमली पदार्थ साठा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी आज दुपारी विन्स हॉस्पिटल परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना ताब्यात घेतल. परशुराम उर्फ बबलू बिरांजे ओमकार राजेश सारवान ,दिलदार चौगोंडा कांबळे अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी उमळवाडीतून इथून हा गांजा आणल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झालीय.

पोलिसांनी त्यांच्याकडून 28 हजार रुपये किमतीचा गांजा एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या दोन मोपेड आणि सात हजार रुपये किमतीचा मोबाईल संच असा एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अरविंद रायबोले पोलीस, निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, महेश पाटील, अक्षय व्हरांबळे, बाबा ढाकणे, विकास चौगले, रवी आंबेकर, सुशील गायकवाड, सनीराज पाटील यांनी मिळून केली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.