“पर्यावरण संवर्धनासाठी शाहूपुरी पोलिसांचा पुढाकार; ‘हरित महाराष्ट्र’ अभियानात ७५ वृक्षांची लागवड”

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गोळीबार मैदान, कसबा बावडा येथे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत वृक्षारोपण करताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी-अंमलदार.

कोल्हापूर प्रतिनिधी – राज्य शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आणि वन महोत्सवाच्या निमित्ताने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने गोळीबार मैदान, कसबा बावडा येथे ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. राज्यात वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने २०२६ ते २०४७ या २१ वर्षांच्या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. दरवर्षी १५ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो.

याच अभियानाचा भाग म्हणून पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याने गोळीबार मैदान, कसबा बावडा येथे ७५ वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत काकंडकी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल डोईजड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत आटपाडकर, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाटील यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन केल्यास भविष्यातील पिढ्यांना अधिक सुरक्षित व समृद्ध पर्यावरण लाभेल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.