हरित महाराष्ट्र अभियानाला कसबा वाळवेतून उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते अरुण जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

वृक्षसंवर्धनाची घेतली शपथ

कसबा वाळवे (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हाभर सुरू असलेल्या वृक्षलागवड मोहिमेला कसबा वाळवे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानास पाठिंबा दर्शवत कसबा वाळवे गावात जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते अरुण मारुतीराव जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या स्थानिक हवामानास पूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनाचे महत्त्वही उपस्थितांना पटवून देण्यात आले.

यावेळी बोलताना अरुण जाधव म्हणाले, “वृक्षलागवड हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून समाजाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेला लोकसहभागाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. लावलेले प्रत्येक रोप जगले तरच हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, राज्य शासनाने हाती घेतलेल्या व्यापक वृक्षलागवड मोहिमेत ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा, शेतकरी, युवक, महिला बचत गट, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळ उभी राहिल्यास गावांचा विकास अधिक शाश्वत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्स्या सौ मंगल शिवाजी कांबळे, कृषी अधिकारी गोंगाने, उपसरपंच युवराज पोवार, ग्रामपंचायत सदस्य एम बी पाटील, सचिन फराक्टे, तंटामुक्ती अध्यक्ष सागर भांदिगरे, ग्रामसेवक अशोक भांदिगरे, प्राध्यापक डॉ. सतीश पाटील, निवास फराक्टे, अरविंद पाटील, गणेश पाटील, संजय पाटील, मोहन पाटील, नामदेव कांबळे पोपट केसरकर, सुरेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.