काेल्हापूर जिल्ह्यात बहुचर्चित आणि पाेलिसांच्या तपासाचा एक भाग बनलेल्या प्रतिष्ठेच्या निकालाची तब्बल चार वर्षानंतर काहीशी उत्सुकता शिगेला लागली आहे. बहुचर्चित शमा मुल्ला केसमध्ये तब्बल 4 वर्षानंतर कोल्हापुरात कोर्टाकडून पहिल्यांदा जामीन मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील सर्वांत मोठी मोक्याची कारवाई असलेल्या शमा मुल्ला केस मध्ये आरोपी नं 16 ओंकार पारिसवडकर याचा कोल्हापूर विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
दि 15-06-2023 रोजी विशेष न्यायधीश एस आर.साळुंखे यांनी हा जामीन अर्ज मंजूर केला. सरकारी पक्षातर्फे सदर जामीन अर्जास जोरदार विरोध करण्यात आला होता परंतु ,आरोपीचे वकील सतिश कुंभार यांचा युक्तिवाद योग्य ठरवत न्यायालयाने आरोपीस 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
लोकन्यायालय हे लोकाभिमुख उपक्रम
एप्रिल 2019 मध्ये प्रक्षिणार्थी पोलीस अधीक्षक यांच्या पथकावर यादव नगर , कोल्हापूर येथे मटक्याच्या कारवाई करताना हल्ला झाला होता .त्यानंतर पोलिसांनी रात्रभर कॉम्बिग ऑपरेशन करून 42 जणांनावर मोका अंतर्गत कारवाई केली होती. राज्यातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी मोक्याची कारवाई मानली जाते.मटका धंद्यातील अनेक बड्या माशांवर ह्यात कारवाई झाली होती. त्यामुळे पाेलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र काैतुक हाेत हाेते. तर दुसऱ्या बाजूला या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांनी धास्ती घेतली हाेती. |
संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय… निकालाकडे हाेते लक्ष
विविध आरोपीतर्फे आजपर्यंत जामीन मिळवण्यासाठी अनेकांनी विविध प्रयत्न केले होते. पण कोल्हापूर कोर्टाने आजतागयत एकही आरोपीचे इंटरीम जामिनावर मुक्तता केली नव्हती. शमा मुल्ला केस वर संपूर्ण राज्याचे लक्ष होते. गेल्या काही महिन्यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने सर्व आरोपीना मोक्का लागतो म्हणून आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता.परंतु आरोपीचे वकीलांनी वस्तुनिष्ठ अभ्यास आणि सुयोग्य मांडणी करून जिल्हा न्यायालयातच आरोपीला जामीन मंजूर घेतला. त्यामुळे या निकालाची आणि जामिनाची चर्चा सुरु हाेती. या खटल्यातील सदर आराेपीतर्फे अँड.सतिश कुंभार, भारत सोनूले, सारंग कुराडे यांनी काम पाहिले तर प्रीती देवर्डेकर, सरोज देसाई यांचे सहकार्य लाभले. आता या प्रकरणातील एक जामिन मंजूर झाल्याने पुढील आराेपींचे काय हाेणार, त्यांच्याविषयी पुढील काळात निकाल कसा लागणार याकडेच संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.