विजय बकरे
३० जुलैला मतदान तर३१ जुलैला मतमोजणी…
राधानगरी – गेल्या वर्षभरापासुन लांबलेल्या परिते ता.करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. उद्यापासुन दि. २० जुनपासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असुन दि. ३० जुलैला मतदान होणार आहे तर ३१ जुलैला मतमोजणी होणार आहे त्यामुळे सर्वपक्ष, गट, तट तयारीला लागले आहेत.
भोगावती कारखान्याची निवडणुक गेल्या वर्षभरापासुन लांबत चालली होती. पावसाळ्याच्या तोंडावर निवडणुक होणार की नाही?याबाबत उलटसुलट चर्चा होत असताना कारखाना प्रशासनाने निवडणुक प्राधिकरणाकडे निवडणुकीसाठी आवश्यक माहीती पुरविली. आज राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन निलकंठ करे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुक कार्यक्रम पुढीलपमाणे –
दि. २० ते २७ जुन उमेदवारी अर्ज दाखल करणे, दि. २९ जुन उमेदवारी अर्जाची छाननी, दि. ३० जुन पात्र उमेवाराच्या नावाची यादी प्रसिद्ध करणे, दि. १४ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस, दि. १७ जुलै उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप, दि. ३०जुलै रोजी सकाळी ८ ते सायं ५ पर्यत मतदान तर ३१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. प्रचारासाठी १३ दिवसांचा अवधी असुन ऐन पावसामध्ये रणधुमाळी उडणार आहे.