विनायक जितकर
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेश सुरु…
कसबा बावडा – डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाच्या नव्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्थेस अखिल भारतीय तंत्र शिक्षण आयोगाकडून मान्यता (एआयसीटीई) मिळाली आहे. त्यानुसार नव्या संस्थेत वर्ष २०२३- २४ साठी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील यांनी दिली.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठामार्फत सध्या मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज, स्कूल ऑफ हॉस्पिटलिटी, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस, सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्च, फार्मसी कॉलेज आदी शाखा चालवल्या जातात. अभियांत्रिकी शिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेऊन देश पातळीवर विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाची तंत्र शिक्षण सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने विद्यापीठाच्यावतीने ‘एआयसीटीई’कडे नवीन संस्था सुरु करण्यासाठी विनंती अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार ‘एआयसीटीई’च्या समितीने आवश्यक सर्व सोयी- सुविधांची पडताळणी केली. त्यानुसार १९ जून रोजी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंटला मंजुरी मिळाली असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी दिली.
नव्या संस्थेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनिअरिंग १८० जागा, इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल इंजीनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनिअरिंग (डाटा सायन्स), एम.बी.ए व एम.सी.ए प्रत्येकी ६० जागा आणि बी.सी.ए व बी.बी.ए. च्या प्रत्येकी १२० जागा या संस्थेत उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार विद्यापीठाकडून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सीईटी, जे.ई.ई. किंवा समकक्ष अन्य सीईटी परीक्षा दिलेला विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असून प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ जून आहे. शासन नियमानुसार सर्व शिष्यवृत्ती लागू असून विद्यापीठातर्फे प्रत्येक शाखेतील सर्वोच्च गुणप्राप्त विद्यार्थ्याला सौ. शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप अंतर्गत संपूर्ण वर्षाची फी माफ केली जाणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली. |
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, सीएसचआरओ श्रीलेखा साटम, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. लीतेश मालदे, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.