जी. जी. पाटील यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ…
शिराळा – डोंगरी व दुर्गम भागातुन सुमारे तीस वर्षापासुन पत्रकारीतेला वाहुन घेतलेले एक व्यक्तीमत्व म्हणजे श्री. गंगाराम गोविंद पाटील उर्फ जी. जी. पाटील सर…त्यांच मुळ गाव कोल्हापुर जिल्ह्यातील कुरुकली असलं तरी त्यांचा निम्याहुन अधिक कार्यकाल सांगली जिल्ह्यातील सोनवडे या गावातचं गेला.
आपल्या गावापासुन कोसोमैल दुर नोकरीच्या निम्मीत्ताने सोनवडे ता. शिराळा या गावामध्ये कुटुंबासहीत वास्तव्यास असताना जी. जी. पाटील सरांनी अल्पावधीतच गावातील जनमाणसात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं त्यांच्या कुटुंबाचं व आणि ग्रामस्थांचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आजही ते कायम आहे. नोकरी निम्मीत्ताने परक्या गावात असुनही त्यांना कधीचं परकेपणाची जाणीव झाली नाही कारण आमच्या गावाने भरभरुन दिलेलं प्रेम इतकच नाही तर त्यांच्या अजारपणाच्या काळात सोनवडे गावातुन त्यांना कोल्हापुरला दवाखाण्यात बघण्यासाठी लागलेली माणसांची रीघ त्यांनी जपलेल्या चांगुलपणाची आठवण करुन जाते. सोनवडे गावात दरवर्षी होणारे गणेशोत्सव, दसरा, पारायण यासारख्या सार्वजनीक कार्यात ते हीरीहीरीने सहभागी व्हायचे व अनेकवेळा अन्नदान हेच श्रेष्टदान मानुन अनेक उपक्रमामध्ये अनदानासाठी सढळ हाताने मदत करायचे.मात्र आज त्यांच्या निधनामुळे सोनवडे सामाजीक बांधीलकी जपणारे व्यक्तीमत्व हरपले. असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जी जी पाटील सरांनी केलेल्या कामाचा गौरवही अनेक ठिकाणी झाला त्यांना आदर्श पत्रकार,कृतज्ञता सन्मान पुरस्कार यासह अन्य सन्मानही प्राप्त झाले असे उत्तुंग व्यक्तीमत्व आज हरपले.त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या कुटुंबाला दुःखातुन सावरण्याची ताकद ईश्वर देवो हिच प्रार्थना…
मनाला खूप वाईट वाटले मला खूप चांगली साथ त्यांनी दिली होती. मार्गदर्शन लाभले. खूप मनमिळावू, बोलका स्वभाव, नेहमी मदतीची भावना, विद्यार्थी व समाजात कायमच ते लोकप्रिय राहिले. विविध संघटनांमध्ये ही त्यांनी कामगिरी चांगली केली होती. त्यांच्या जाण्याने मन गहिवरून आले. त्यांना मनापासून श्रद्धांजली. आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. शेखर धोंगडे |