भर दिवसा दोन महिलांनी सराफी दुकानातून दागिने केले लंपास…
कोल्हापूर : जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल भाऊसिंगजी रोडवरील एका सराफ पिढीत दोन बुरखाधारी महिलांचे कृत्य सी. सी. टीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू आहे.
कोल्हापुरात भर दिवसा एका सराफी दुकानातून दोन बुर्कादारी महिलांनी तब्बल एक लाख 43 हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घडलाय. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे या महिलांचा शोध घेत आहेत.
शहरातील भाऊसिंगजी रोडवर असणाऱ्या एका सराफे दुकानात गुरुवारी दुपारी दोन बुरखादारी महिला खरेदीच्या पाहण्याने आल्या होत्या. दुकानातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून एक लाख 43 हजार दोनशे रुपये किमतीच्या अडीच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून या महिलांनी पलायन केलं. याप्रकरणी पुष्कराज बनसीधर चिपडे यांनी या महिला विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेच्या आधारे या महिलांचा शोध घेत आहेत.