गोकुळच्या आघाडीतील नेत्यांचा निर्णय…
कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे प्रमुख सत्तास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी संचालक अरूणकुमार डोंगळे यांना संधी देण्याचे निश्चित झाले आहे.
प्रमुख नेत्यांच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. भाजपचे नेतृत्व करणाऱ्या विरोधी महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी संघाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या नुसार तपासणी सुरू आहे. या परिस्थितीत सक्षम नेतृत्व म्हणून डोंगळेचे नाव अध्यक्ष पदासाठी पुढे आले. आणि नावावर नेत्यांनी शिका मोर्तब केला आहे. या बैठकीला माजी मंत्री आ. सतेज पाटील, विनय कोरे, हसन मुश्रीफ, राजेश पाटील, माजी आ. के. पी. पाटील, उपस्थित होते. कामानिमित्त बाहेर असलेले या आघाडीतील आ. प्रकाश अबिटकर मात्र गैरहजर होते.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.