आता थेट लाेकांनीच समस्या, कामे सांगावित.. ती तत्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.. केंद्र व राज्यसरकारकडून माेठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. काेल्हापूर शहराला आता बेस्ट सिटी बनविण्याचा मानस असून, लवकरच असंख्य बेराेजगारांना राेजगार देण्यासाठी देखिल एक माेठी गुंतवणूक, माेठी कंपनी येत्या काळात काेल्हापूरात उभी करण्याचा निर्णय झाला असून, तसा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आल्याचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडीक यांनी स्पष्ट केले. ते आयाेजित प्रत्रकार परिषदेत काेल्हापूर येथे बाेलत हाेते. यावेळी त्यांनी माेठ्या पक्षातील काही बडे, लाेक पदाधिकारी, नेते लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचा गाैप्यस्पाेट देखिल केला.
कोल्हापूरच्या विविध विकास कामांसाठी तब्बल 78 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कोल्हापूर शहरातील आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांचा ध्यास घेऊन, सातत्याने पाठपुरावा करून, हा निधी मंजूर करून आणला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोल्हापूरला जास्तीत जास्त निधी मिळावा आणि विकासाच्या क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर व्हावा, यासाठी आपला अधिकाधिक प्रयत्न असताे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून सुमारे 78 कोटी 99 लाख रुपयांचा निधी त्यांनी खेचून आणला आहे. कोल्हापुरातील विमानतळाचे विस्तारीकरण असो किंवा बास्केट ब्रिज बाबतचा पाठपुरावा असो, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे. जिल्ह्याच्या दूरगामी विकासाचे प्रकल्प आखून ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मंजूर झालेल्या 78 कोटी 99 लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांची माहितीचा लेखाजाेगा यावेळील त्यांनी वाचला.
नागरिकांच्या मागणीनुसार शहरातील विकास कामे करणार
यापुढेही कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी आणण्याचा खासदार धनंजय महाडिक यांचा निर्धार असून, त्यांनी एक अभिनव योजना आखली आहे. शहरातील नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागातील अत्यंत निकडीची विकास कामे खासदार महाडिक यांना सुचवावीत. नागरिकांच्या मागणीनुसार शहरातील सर्व 81 प्रभागात विकास कामे केली जातील. त्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रभागातील प्राधान्याने आणि तातडीने करावयाच्या विकास कामांची माहिती, खासदार महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात लेखी स्वरूपात आणून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.